या बँकेची विशेष योजना, FD वर मिळणार इतक्या टक्क्यापर्यंत व्याज

Buisness Batmya
नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आली आहे. येस बँकेने मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेट वाढवल्यानंतर बँका मुदत ठेवींचे दर वाढवत आहेत.
Gold Price सोन्याच्या किमतीत वाढ
बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 3 जानेवारी 2023 पासून लागू झाले असून बँकेने 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दरांनुसार, आता सामान्य गुंतवणूकदारांना 7 दिवसांपासून ते 120 महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 3.25 टक्के ते 7 टक्के व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीच्या FD वर 3.75% ते 7.75% पर्यंत व्याज मिळणार आहे.
तसेच येस बँकेच्या विशेष एफडी योजनेवर गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळणार असून 30 महिन्यांच्या मुदत ठेवींवर सामान्य गुंतवणूकदारांना 7.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याज मिळेल.
या शेअरने गुंतवणुकदारांचे १ लाखाचे झाले ७ लाखांहून अधिक
येस बँक एफडी दर सामान्य गुंतवणूकदारांसाठी- 7 ते 14 दिवसांच्या FD वर – 3.25 टक्के, 15 ते 45 दिवसांच्या FD वर – 3.70 टक्के,
FD वर 46 ते 90 दिवस – 4.10 टक्के, FD वर 91 ते 180 दिवस – 4.75 टक्के, FD वर 181 ते 271 दिवस – 5.75 टक्के, 272 ते 1 वर्षापेक्षा कमी FD वर – 6 टक्के, एक वर्ष ते १२० महिन्यांच्या FD वर – ७ टक्के प्रमाणे असेल.
Motorola चा Moto Buds 600 ANC इयरफोन लाँच, डिव्हाइस मल्टीपॉइंट तंत्रज्ञानाने सुसज्ज