Earnings मालकाला हा बैल महिन्याला कमवून देतो आडीच लाख रुपये
This bull earns the owner two and a half lakh rupees per month
बीजनेस बातम्या / businessbatmya
सोलापूर 31 डिसेंबर 23 Earnings गाई, म्हशी, जनावरे आपण ग्रामीण भागात पाळत असतो, गाई व म्हशी दूध देऊन शेतक-यांना कमाई करुन देतात. मात्र एकचं बैल दहा गाई पेक्षा जात् उत्पन्न देतो. पहा या बैलाचा संपूर्ण व्हिडीओ.
आजवर तुम्ही महागड्या किंमतीचे धष्टपुष्ट बैल पाहिले असतील.. पण कधी 41 लाखांचा, 7 फुट उंचीचा बैल पाहिलाय का? नसेल पाहिलात तर सोलापुरच्या कृषी प्रदर्शनाला नक्की भेट द्या.. कारण या कृषी प्रदर्शनात सोन्या बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय..कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच बैल म्हणून त्याची ओळख आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील हा बैल आहे. सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार चन्नाप्पा आवटी सोन्याचं पालनपोषण करतायत 41 लाख रुपयांचा हा बैल आहे. 7 फूट उंच, 9 फूट लांब आहे. तब्बल 1 टनांहून अधिक वजन आहे. हा बैल महिन्याला 50 हजारांचा खुराक खातो. चन्नाप्पा आवटी या बैलापासून महिन्याला अडीच लाखांचं उत्पन्न कमवतात