आता एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार, या बॅंकेने सुरू केली ही सुविधा

buisness batmya
मुंबई : सध्या डिजिटल फसवणूकीचे प्रमाण खूप वाढले आहेत. त्यामुळे अनेकजण या फसवणुकीला बळी पडताना दिसतात. म्हणूनच याप्रकारे होण्यात येणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरबीआय बॅंकेने सर्व बँकांना एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अनेक प्रकारे होणारी फसवणूक ही टाळता येणार आहे.This facility has been introduced by the bank to withdraw money from ATMs without a card
दरम्यान ही सुविधा देशातील काही बँकांकडूनच दिली जात असून, ग्राहकांना ही सुविधाही तेव्हाच मिळत आहे, जेव्हा ते संबंधित बँकेचे एटीएम वापरात आणत आहे. परंतु या सेवेचा आता विस्तार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
येणा-या आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये करणार गोळा
याबाबत द्विमासिक पतधोरणाची घोषणा करते वेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की आता यूपीआय वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याच्या सुविधेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे कार्डशिवाय कॅश काढण्याच्या सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, क्लोनिंग यांसारख्या गोष्टींना आळा बसणार आहे.
कार्डविना असे पैसे काढा
या सुविधेचा वापर करताना कार्डविना एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोबाइल ॲपचा वापर करण्यात येणार आहे.तसेच ही पूर्ण प्रणाली ओटीपीच्या मदतीने काम करत असल्यामुळे ओटीपीच्या मदतीनेच मोबाइल ॲपच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत. तसेच या सुविधा सध्या स्टेट बँक ॲाफ इंडिया, बँक ॲाफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, यांच्या एटीएममध्ये कॅशलेस व्यवहार उपलब्ध आहेत.
या जाहीर झालेल्या सुविधेचा व्यवहार हा यूपीआयद्वारे एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ = ४५अब्ज+, मागील आर्थिक वर्ष = २२अब्ज+, चालू आर्थिक वर्षात व्यवहार= ८४ लाख कोटी,आघाडीवर कोण? । कंपनी व्यवहार %वारी, फोन पे २०.७अब्ज ४६%, गुगल पे १५.८अब्ज ३५%, व्हॉट्सॲप १७ दशलक्ष, पेटीएम १३% अशा प्रकारे करता येणार आहे.