एअर इंडिया कर्मचा-यांसाठी कंपनीकडून ही सुविधा होणार सुरू

buisness batmya
मुंबईः एअर इंडिया कंपनीने आता कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांना शेअर होल्डर बनण्याची संधी देणार असून विमान कंपनीकडून कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शन दिला जाणार आहे. तसेच या अंतर्गत ते कंपनीचे शेअर होल्डर बनू शकणार आहे.This facility will be introduced by the company for Air India employees
दरम्यान टाटा समूहाने जेव्हापासून एअर इंडिया कंपनी विकत घेतली तेव्हापासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चांदी झाली आहे. आणि तसे या आधीही टाटा कंपनीकडून पगार कपात मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती. पण काही दिवसांनंतर, कंपनीने आता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी ग्रुप मेडिकल इन्शुरन्स सुरू करण्याविषयी बोलल्याचे समजते.
एअर इंडिया कंपनीचा या प्रक्रियेमागील उद्देश कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे हा आहे. याबाबत मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी परफॉर्मन्स इंडिकेटरही लागू केले जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारणार असून तो दीर्घकाळ कंपनीत राहत आहे. सध्या इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शनची सुविधा दिली आहे.
मारूतीने लाँच केली Maruti XL6; किंमत किती व काय नवीन…
यापूर्वी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिकल इन्शुरन्स देण्याची घोषणा केली होती. देशभरातील मोठ्या रुग्णालयांच्या नेटवर्कमध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. तसेच ही सुविधा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी १५ मेपासून सुरू होणार आहे.
तसेच कर्मचार्याला एअर इंडियाने प्रदान केलेल्या ग्रुप मेडिकल इन्शुरन्समध्ये रु. ७.५ लाखांचा विमा असणार आहे. यामध्ये एका कुटुंबातील जास्तीत जास्त ७ सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यात कर्मचाऱ्याची पत्नी, तीन मुले आणि २ आई-वडील/सासरे यांचा समावेश असेल. आणि ही विमा पॅालिसी कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी वापरू शकतात.
व्हॅाटस्अप तुमचा खिसा रिकामा करणार पण यामाध्यमातून…