launched भारतात लाँच झाली ना ही महत्वाची गोळी

business batmya
नवी दिल्ली : मोलनुपिरावीर भारतात लाँच ( molnupiravir launched in india ) करण्यात आली. कोविड अँटीव्हायरल औषध म्हणजे ही गोळी होय.
करोनाची सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांना या गोळीचा पाच दिवसांचा कोर्स घ्यावा लागले. अनेक लोक या गोळीच्या प्रतीक्षेत होते. आता ही गोळी लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.
मोलनुपिरावीर सोबतच सीडीएससीओने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविड लस COVOVAX आणि हैदराबादच्या बायोलॉजिकल E RBD प्रोटीन CORBEVAX या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर दिली होती.
देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) तज्ज्ञ पॅनेलने अलिकडेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरला मंजुरी दिली आहे.
Molnupiravir 800 mg चा शिफारस केलेला डोस हा पाच दिवसांचा आहे आणि दिवसांतून दोनदा या गोळ्या घ्यायच्या आहेत. प्रत्येकी २०० मिलीग्रॅम असलेल्या ४० गोळ्या (कॅप्सूल) घेणे रुग्णाला आवश्यक आहे.
तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या या गोळीचे उत्पादन करण्यासाठी टोरेंट, सिप्ला, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, नॅटको, मायलॅन आणि हेटेरो यासारख्या अनेक फार्मा कंपन्यांची प्रक्रिया सुरू आहे..
हे औषध SARS-CoV-2 द्वारे संसर्ग झालेल्यांमध्ये COVID-19 वर उपचार करण्यासाठी वापरले जाते.मोलनुपिरावीर हे एक अँटीव्हायरल औषध आहे, जे विशिष्ट आरएनए व्हायरला आळा घातले.