आर्थिक

तुमच्या बॅंकेतील खात्यावरील पैसे या पध्दतीने गायब करतात हे लोक

This is how money disappears from your bank account

business batmya / business News / बिझनेस बातम्या

नवी दिल्ली, ता.17 आॅक्टोबर 2024- (आनलाईन डेस्क )  सध्याचे युग हे मोबाईलचे युग आहे आणि त्यामुळे भामट्यांचा चांगलंच फावते. हे काही क्षणामध्ये तुमच्या बँकेतल्या पैशांवरती डल्ला मारून तुमचं खातं रिकामा करतात.  हे सायबर क्राईमवाले कशा पद्धतीने लूट करतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. दहा पद्धतीनं हे लोक तुमच्या बँकेच्या खात्यावर डल्ला मारतात. या दहा कोणत्या पद्धती आहे की ज्या पद्धतीमधून हे सायबर क्राईम वाले आपल्या बँक खात्यावरती डल्ला मरतात आणि तुमचे पैसे अलगद चोरुन घेतात.

वेळोवेळी आपल्याला आरबीआय आणि विविध संस्था या सायबर क्राईम पासून वाचवण्यासाठी विविध सल्ले देत असतात. तुमच्या वरती कशा पद्धतीने तुमचा मोबाईल हॅक करून तुमच्या बँकेतले पैसे कशा पद्धतीने ढापले जातात याच्यावर सूचना दिल्या जातात.

2024 जानेवारी ते मी दरम्यान तब्बल 9.5 लाख कंप्लेंट आतापर्यंत सायबर गुन्ह्यांमध्ये नोंदवण्यात आल्यात या गुन्हे मध्ये लोकांचे पैसे खात्यामधून गायब झालेले आहे.

TRAI अधिकारी बनून कॅाल

सायबर क्राईम वाले टी आर आय चा TRAI अधिकारी बोलतोय असं म्हणून तुमच्यासोबत संवाद साधतात. तुमचा सिम कार्ड त्याच्यानंतर तुमचा आयडी याच्यावरती ते विविध पद्धतीने चर्चा करत तुमचा अन्य नंबरच्या विषयी ते बोलतात आणि नंतर मग ते मनी  लाऊंड्रिंग व ड्रग्स केस मध्ये शामिल आहे असं बोलून तुम्हाला अडकून ठेवतात.

Digital arrest spam

डिजिटल अरे स्पॅमसही अनेक लोक शिकार होत आहे यामध्ये गरीब आणि सर्वसामान्य लोकांना कॅमेऱ्याच्या पुढे राहण्यासाठी सांगितले जातात आणि एक महिला त्यांना याच्यामध्ये गुंतून ठेवत त्यांच्या बँकेतले खाते रिकामे केलं जातं.

परिवारातील लोकांना अटक केल्याचा फोन

तुमच्या परिवारातील लोकांना अटक दाखवून पैशाची लूट केली जाते त्यावरती फोन केला जातो आणि सांगितल्या जाता की तुमच्या नातेवाईकांमध्ये आम्ही अरेंज केलेला आहे तुम्ही तात्काळ पैसे पाठवा आणि अशा पद्धतीने तुमचे बँकेचे खातात रिकामा केला जातं.

फेक ऑनलाईन ट्रेडिंग

तुमच्या बँकेतील पैसे रिकामा करण्याचं अजून एक मोठं सायबर क्राईम वाले फायदा साधतात ते म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये पैसे गुंतवण्यात सांगतात थोडे तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर त्याचा परतावाही ते लोक देतात मात्र जेव्हा तुम्हाला खात्री होते की याचा परतावा मिळतोय त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही मोठी रक्कम गुंतवतात त्यावेळेस मात्र तुम्हाला चुना लागलेला असतो.

पार्ट टाइम जॉब

पार्ट टाइम जॉब म्हणजे हे लोक तुमच्या खात्यावर एकदा पन्नास रुपये टाकतात आणि ज्यावेळेस तुम्हाला पैशाचा लालच लागतात त्यावेळेस तुम्ही त्या मोहाला बळी पडतात आणि मग तुमच्यावर प्रेम करून तुमच्या खात्यातले पैसे काढले जातात

माध्यमातून ते आनओळखी नंबर वरून आपल्याला व्हॅाटसअप फेसबुकवर व्यक्तीगत मेसेज करतात आणि यामध्ये तुम्ही सिम्पल असा फोटो किंवा व्हिडीओला लाईक करा असे सांगून पैशांची लुट करतात.

खोट पार्सल चा फोन

यामध्ये हे लोक तुम्हाला फोन करतात आणि सांगतात की तुमच्याकडे पार्सल साठी हा कॅाल केलेला आहे. तुमच्या नावावर आलेले पार्सल   पोलीसांच्या हाती लागले आहे.  आम्ही सीबीआय मधून बोलतो आहे असा खोटा कॉल करून तुमच्याकडून पैशाची लुट केल्या जाते.

महिलेचा व्हिडीओ कॅाल

अनेक महिला व्हिडिओ कॉल करतात आणि आपण कॉल करून सांगतात की तुमचे माझे बोलणे झाले आहे. तुम्हाला मला बिना कपड्याचे पाहिले आहे. मी तुमचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलं करील म्हणून तुमच्याकडून पैशाची लुट केली जाते.

खोटा पैसे ट्रान्सफर करणे

काही लोक जाणून-बुजून तुमच्या खात्यावरती खोटे पद्धतीने मुद्दाम थोडेफार पैसे सेंड करतात आणि तुम्हाला सांगतात की आमच्याकडे नजर चुकीने हे पैसे तुमच्या खात्यावर पडलेले आहे तुम्ही कृपया ते पुन्हा आम्हाला परत करा ज्यावेळेस तुम्ही परत करायला जातात त्यावेळेस तुमचा आयडी ट्रॅक केला जातो आणि तुम्हाला गंडल्या जातं

व्हॅाटसअप वर फेक एप डाऊनलोड करण्याचा मेसज 

यामध्येही अनेक लोक व्हाट्सअप वरती एक ॲपची  APK नावाची फाईल पाठवतात आणि या फाईलच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ते एप डाउनलोड करतात. त्या वेळेस तुमच्या मोबाईल मधील सर्व एक्सेस त्या हॅकर्स कडे जातात आणि तुमच्या बँक खात्याचा आयडी पासवर्ड व इतर सर्व माहिती त्यांना कळून जाते. त्यामुळे तुम्हाला या माध्यमातून पैशाचा चुना लावल्या जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!