आर्थिकविमा/कर्ज

या बॅंकेत खाते असणा-यांना होणार 5 लाखांपर्यंत फायदा

business batmya

मुंबईः

मुंबई,  : RBI ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेली DICGC बँक, ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. डीआयसीजीसीने नोटीसमध्ये म्हटले आहे की दोन्ही सहकारी बँकांच्या ठेवीदारांना वैध कागदपत्रे सादर केल्यावर विम्याची रक्कम निर्दिष्ट पर्यायी बँक खात्यात (specified alternative bank account) दिली जाईल. 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार यातून मिळणार आहे. Those who have an account with this bank will get a benefit of up to Rs 5 lakh

ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळ (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation- DICGC) 27 एप्रिल रोजी लखनौ स्थित सहकारी बँक इंडियन मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र ठेवीदारांना पेमेंट करेल. त्याच बरोबर बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना (Bank Account Holders) 6 जून रोजी पैसे दिले जाणार आहेत. एबीपी न्यूज हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

8 सहकारी बँकांचे क्लेम निकाली काढले जातील

2021-22 या आर्थिक वर्षात DICGC ने आठ सहकारी बँकांचे क्लेम निकाली काढले होते. यामध्ये गोव्यातील मडगाम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 32,221 ठेवीदारांकडून सुमारे 136 कोटी रुपये, महाराष्ट्रस्थित कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 38,325 ठेवीदारांकडून 374 कोटी रुपयांचा समावेश आहे. कराड जनता सहकारी बँकेच्या 39,032 ठेवीदारांनाही 330 कोटी रुपये देण्यात आले.

तुम्हाला किती कव्हर मिळतो?

याआधी डीआयसीजीसी कायद्याच्या कलम 16(1) अंतर्गत, ठेवीदाराला केवळ 1,500 रुपयांचे विमा संरक्षण मिळत असे, परंतु गेल्या तीन दशकांमध्ये विम्याची ही रक्कम हळूहळू वाढत गेली. यावर्षी 4 फेब्रुवारीपासून ठेवींवरील विमा संरक्षण 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!