आर्थिक

आज पुन्हा पेट्रोल, डिझेल भडकले आता इंधन काही थांबत नाही!

Bussness batmya

नवी दिल्लीः

Petrol, Diesel Price Hike :  मंगळवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.01 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.88 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.10 रुपये झाला आहे. today-again-petrol-diesel-exploded-now-fuel-does-not-stop

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल आठवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. today-again-petrol-diesel-exploded-now-fuel-does-not-stop

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये तर डिझेल 99.25 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 115.09 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 114.71 आणि 97.46 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 114.96 रुपये लिटर आणि डिझेल 97.73 रुपये लिटर इतके आहे.आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 80 पैशांची तर डिझेलच्या दरात देखील 80 पैशांचीच वाढ करण्यात आली आहे.

या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा अधिक महाग

नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.  गेल्या नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल सहा रुपयांनी महाग झाले आहेत.22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते.गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आठवेळ वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!