तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल- डिझेलचे दर महाग की स्वस्त? पहा

Buisness Batmya
नवी दिल्लीः जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून गेल्या २४ तासांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे ३ डॉलरची घसरण झाली आहे. त्याचा परिणाम बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून आला आणि आज अनेक शहरांमध्ये तेल स्वस्त झाले आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदललेले नाहीत.
Share Market शेअर बाजारात कमजोर सुरूवात, आज या शेअर्समध्ये घसरण
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 83 पैशांनी स्वस्त झाली आहे आणि 108.481 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे, तर डिझेल 75 पैशांनी स्वस्त होऊन 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 5 पैशांनी घसरून 96.89 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 6 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासांत त्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $3 ने घसरून $82.43 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआयची किंमत अडीच डॉलरने घसरून प्रति बॅरल $ 77.22 वर आली आहे.
या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदाराचे 1 लाखाचे झाले 45 कोटी
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर- दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर प्रमाणे आहे.
कोणत्या शहरात किती दर?- नागपूर : पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटर, पुणे : पेट्रोल १०५.८४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटर, कोल्हापूर : पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.०१ रुपये प्रति लिटर, औरंगाबाद : पेट्रोल १०८ रुपये, डिझेल ९५.९६ रुपये प्रति लिटर, परभणी : १०९.४५ रुपये प्रति लिटर, डिझेल ९५.८१ रुपये प्रति लिटर,
नाशिक : पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर प्रमाणे आहे.
BSNL च्या या प्लान्समध्ये 1000GB डेटासह अमर्यादित कॉलिंग, किमत किती पहा