Tomato prices यंदा टोमॅटोचा भाव पुन्हा 4000 रुपये कॅरेटवर जाणार!
Tomato prices Tomato prices will again go to 5000 rupees per carat!

बीजनेस बातम्या / business batmya / business News
साहेबराव ठाकरे
मुंबई, 22 मार्च 2024: Tomato prices Tomato prices Tomato prices will again go to 4000 rupees per carat! मागील वर्षी जून महिन्यामध्ये टोमॅटो उत्पादनात मोठी घट आली परिणाम टोमॅटो भाव वाढल्याने त्याचा थोडाफार फायदा शेतक-याला झाला. मागील वर्षी पाऊस कमी असल्यामुळे टोमॅटो पिकाला सुरुवातीच्या काळात चांगला भाव मिळाला. मात्र यंदाची परिस्थिती अजून बिकट असल्यामुळे या वर्षीही मागील वर्षाप्रमाणे् टोमॅटो पिक भावाचे शतकं गाठणार म्हणजे टोमॅटोला 4000 रुपये प्रति कॅरेट किंवा जास्त भाव मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. या महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे, असे जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही चुकत आहात. भाव वाढले तरी शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे.
मागील वर्षी जून महिन्याच्या आगोदर अवघ्या 15 दिवसांपूर्वी टोमॅटो कमी दरात मिळत होता. त्या वेळी,शेतक-याने टोमॅटो प्रत्यक्षात फेकून दिले. अचानक टोमॅटो भाव उठले.
राज्याच्या सर्वच भागात पावसामुळे त्यावेळी भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला असून, पावसामुळे भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले असून, त्यामुळे राज्याचे बजेट विस्कळीत झाले होते.
यंदा दुष्काळामुळे टोमॅटो पिक उभे करणे अवघड
मागील वर्ष संपूर्ण कोरडं गेलं ,राज्यात अद्यापही हवा तेवढा पाऊस झालेला नाहीये. ऑगस्ट महिन्यात तर केवळ 31 टक्के एवढाच पाऊस झाल्याची माहिती समोर आली होती. सोयाबीन, मका ही पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत जळून खाक झाली. आहेत. नद्या नाले अनेक महिन्यापासून वाहिलेचं नाही. विहिरींनी तळ गाठलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. सध्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करण्याची वेळ येत आहे. पाच पाच किलोमीटर अंतरावरुन नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पिके करणे अथवा जगविणे अवघड बनले आहे.
या वर्षी विहीरत पाणीचं नसल्याने टोमॅटो पिक कसे उभे करणार हा प्रश्न शेतक-यांच्या पुढे उभा आहे. टोमॅटो पिका भाव मिळणार अशी अशा शेतक-यांना आहे. जून मध्ये टोमॅटो सुरु झाला तर चांगला भाव मिळतो असा शेतक-याचा अनुभव झाला आहे. त्यामुळे यंदा जर पिण्यासाठी पाणी नाही तेंव्हा टोमॅटो कसे लावणार असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
ऐन उन्हाळ्यात टोमॅटो पिके घेणे उष्णतेमुळे शक्य होती नाही. प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करुन शेतकरी टोमॅटोचे पिक घेण्याचे नियोजन करत आहे. मात्र त्यासाठी पाणी तर पाहिजेत पाणी कोठून आणणार…हा प्रश्न शेतक-यांपुढे उभे आहे. येत्या काळामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे टोमॅटो पिकाला पुन्हा 4000 रुपये प्रति कॅरेट भाव मिळणार अशी शेतक-यांना अपेक्षा आहे.