TVS कंपनीची नवीन क्रुझर बाइक लवकरच होणार लाँच

Buisness Batmya
मुंबई: सध्या विविध कंपन्यांच्या नवनवीन बाइक बाजारात येऊ लागल्या आहेत. अशातच आत टीव्हीएस कंपनीची नवीन क्रुझर मोटारसायकल भारतीय बाजारात येत आहे. या नव्या क्रुझर मोटारसायकलबाबत बाइकप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे सध्या या बाइकची जोरदार चर्चा आहे. तर TVS कंपनीची आकर्षक असलेली क्रुझर मोटारसायकल लवकरच होणार लाँच केली जाणार असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मात्र या बाइकच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.TVS launches new cruiser bike soon
भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला
टीव्हएसच्या कॉन्सेप्ट मोटारसायकलमध्ये वायर स्पोक व्हील देण्यात आले होते. तसे याशिवाय दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल एबीएस देखील देण्यात आले होते. पण असं जरी असलं तरी उत्पादन मॉडेलमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. कारण नवीन मोटरसायकलमध्ये 220 सीसी माइल्ड हायब्रिड इंजिन मिळू शकते. आणि तसेच कंपनी अपाचे RR310 मधून घेतलेल्या बाइकला 312 cc इंजिन देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या इंजिनसह Zeppelin R ची स्पर्धा होंडा, रॉयल एनफिल्ड आणि जावा यांच्याशी होणार आहे.
स्वस्तात मस्त, Motorola चा कमी किमतीचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च