
बिझनेस बातम्या / मारुती जगधने
नाशिक,ता. 27 आॅक्टोबर 23024
बाणगाव, तालुका नांदगाव (जि. नाशिक) येथे एक बालक व एक महिला एक तरुण असे तिघांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी घटनेत मृत्यु झाला या घटनेमुळे बाणगांव येथे शोककळा /खिर्डी येथे शोककळा पसरली आहे .
ज्यामध्ये तीन जणांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. परंतु, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असफल ठरला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली आहे.
बाणगांव बुद्रुक येथील गाव तळ्यात बाणगांगा नदीवर असलेल्या शेततळ्यात आपल्या मेंढ्याना आंघोळ घालण्यासाठी एक किशोर वयाचा मुलगा वाल्मीक बापु ईटणर वय वर्षे 12 हा मेंढ्याना आंघोळ घालताना पाण्यात बुडाला त्याची पाण्यात बुडतांना ची धडपड आई इंदुबाई वय ३२ हिने बघितले लेकरू संकटात असल्याचे पाहुन तिने कोणताच विचार न करात पाण्यात उडी घेतली .पण तिला पोहता येत नसल्याने ति देखील पाण्यात बुडत असल्याचे पाहुन बाजूला उभा असलेला मुलाचा मामा अंबादास केदु खरात वय २५ याने पण कोणताचा विचार न करत बहिण व भाचा हे पाण्यात बुडत असताना चे द्रुष्य बघितले व पाण्यात उडी घेतली आणी पाण्यात अधिक प्रमाणात गाळ असल्याने तिघेजन पाण्यातील गाळात रुतले व पाण्यात बुडाले.
अशा पध्दतीने या तिघांचा दुदैवी मृत्यु झाला दरम्यान स्थानीका नागरीक व पोलीस प्रशासनाने मदत कार्य सुरु केले व मृत्ताना बाहेर काढले हि घटना दि २६ रोजी दुपारी ३:३० वा दरम्यान घडली.
बाणगांव बुद्रुक येथील स्थानिक नागरिकांनी पाण्यात शोध घेवून दोरी च्या सहाययाने मुत देह बाहेर काढले नंतर आमदार सुहास कांदे यांच्या रुग्ण वाहिणेकेतून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले घटना स्थळी नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी हजर होते.
मेंढपाळ कुटुंबावर मोठे संकट ओढावल्याने नातेवाईक शोकमग्न झाले होते.
बाणगांव येथे पाण्यात बुडून मृत्यु झालेले तिघे जन रा. खीर्डी ता नांदगाव येथील रहिवासी होते.