लाईफस्टाईल

विमान मेहेरबानः स्वस्तात दुबई-युरोपला जाण्याची संधी

Viman Mehrban: Opportunity to fly Dubai-Europe on the cheap

Air India आपल्या ग्राहकांसाठी नेहमी ऑफर देत असते. आता आणखी एक ऑफर लाँच केली आहे. कंपनीने देशांतर्गत आणि इंटरनॅशनल रुटवरती ९६ तासांची स्पेशल सेल सुरू केला आहे.

या ऑफरमुळे कमी पैशात तुम्हाला प्रवास करता येणार आहे. देशांतर्गत मार्गावरील एकेरी भाडे इकॉनॉमी क्लाससाठी १,४७० रुपये आणि बिझनेस क्लाससाठी १०,१३० रुपयांपासून सुरू होते. निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरही असेच आकर्षक भाडे उपलब्ध असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअर इंडियाची www.airindia.com आणि मोबाईल अॅपला भेट देऊ शकता. बुकिंग सेवा पूर्ण मोफत आहे. एअर इंडियाचे फ्लाइंग रिटर्न्स मेंबर सर्व तिकिटांवर दुप्पट लॉयल्टी बोनस पॉइंट मिळवू शकतात.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

एअऱ इंडिया वेबसाइट आणि मोबाईल अॅप व्यतिरिक्त, विक्री अंतर्गत बुकिंग अधिकृत ट्रॅव्हल एजंट आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजंटद्वारे थेट चॅनेल बुकिंगशी संबंधित विशेष लाभांशिवाय देखील केले जाऊ शकते. या सेल अंतर्गत जागा मर्यादित आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहेत.

एअरलाईन्सने या सेलची सुरुवात १७ ऑगस्टपासून केली आहे. प्रवासी निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवासी २० ऑगस्ट २०२३ पर्यंत तिकीट बुक करू शकतात. तिकिटांची विक्री २० ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!