व्हॅाटस्अप तुमचा खिसा रिकामा करणार पण यामाध्यमातून…

businessbatmya
नवी दिल्ली :WhatsApp आपल्या यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्यासाठी वेळोवेळी नवीन फीचर्स आणत असते. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवर मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर जोडले आहे. आता या फीचरचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे यूजर्स चारपेक्षा अधिक डिव्हाइसमध्ये एकच व्हॉट्सअॅप अकाउंट वापरू शकतील.
इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp एक पेड फीचर टेस्ट करत आहे. याद्वारे यूजर्सला सिंगल अकाउंट ४ पेक्षा अधिक डिव्हाइसवर वापरता येईल. सध्या यूजर्स टॅबलेट, कॉम्प्यूटर/लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर एकाच अकाउंट वापरू शकतात. परंतु, दोन स्मार्टफोनवर एकच व्हॉट्सअॅप अकाउंट वापरता येत नाही.
यूजर्स एकावेळी अकाउंटला केवळ एकाच स्मार्टफोनवर वापरू शकतात. WAbetainfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp सबस्क्रिप्शन बेस्ड प्लानवर काम करत आहे, जे खासकरून व्हॉट्सअॅप बिझनेस यूजर्ससाठी असेल. अॅप डिव्हाइसला लिंक करण्यासाठी एक नवीन इंटरफेस क्रिएट करत आहे.
व्हॉट्सअॅप रिवॅम्प्ड इंटरफेसमध्ये मल्टी डिव्हाइस सपोर्टसाठी वेगळे डिस्क्रिप्शन वापरत आहे. या डिस्क्रिप्शननुसार यूजर्स मल्टीपल डिव्हाइसेसवर अकाउंट वापरू शकतील. याच्या मदतीने वेगवेगळी लोक बिझनेस अकाउंटद्वारे ग्राहकांशी एकाचवेळी बोलू शकतील. सबस्क्रिप्शन प्लान्स हे खास WhatsApp बिझनेस अकाउंटसाठी असतील. सबस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला बिझनेससाठी अतिरिक्त फीचर्स देखील मिळतील.
सध्या यूजर्स ४ डिव्हाइसवर एकाचवेळी सिंगल अकाउंट वापरू शकतात. मात्र, सबस्क्रिप्शन प्लान आल्यावर यूजर्स जवळपास १० डिव्हाइसवर एकच WhatsApp अकाउंट वापरू शकतील. यूजर्सला सबस्क्रिप्शन प्लानमध्ये इतरही फीचर्स मिळतील.
मात्र, या फीचर्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, लक्षात घ्या की WhatsApp ने सबस्क्रिप्शन प्लान आणले तरीही तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणे अनिवार्य नाही.
सामान्य यूजर्ससाठी अॅपमध्ये कोणताही बदल होणार नाही व हे फ्री मध्ये उपलब्ध असेल. सबस्क्रिप्शन प्लान पूर्णपणे पर्यायी असेल. खास बिझनेस अकाउंटला याचा फायदा मिळेल. हे एकप्रकारे ट्विटर ब्लू प्रमाणे असेल, जी सबस्क्रिप्शन बेस्ड सर्विस आहे. दरम्यान, WhatsApp आपल्या यूजर्ससाठी लवकरच काही शानदार फीचर्स जारी करणार आहे. यापैकी एक पोल फीचर आहे. कंपनी यूजर्सला WhatsApp ग्रुपमध्ये पोल क्रिएट करणे आणि वोट करण्याचे फीचर उपलब्ध करणार आहे.