टेक

व्हॉट्सअॅपचे नवीन भन्नाट फिचर

business batmya

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप  अजून एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे. या पुढे युजर्स मल्टीपल डिव्हाइसवर चॅट हिस्ट्रीला सिंक करुन शकणार आहेत. या फीचरला कॉपेनियन मोड असे म्हटले जात आहे. यासह, ग्राहक त्यांच्या सेकेंडरी मोबाइल डिव्हाइसला देखील त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटशी लिंक करण्यात पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना दोन मोबाईल्सवर एकच व्हॉट्सअॅप अकाउंट चालविता येणार आहे.आपल्या ग्राहकांसाठी दर वेळी नवनवीन अपडेटेड फीचर घेउन हे फिचर कसं काम करील ते पहुया.

या फीचरसाठी काय कराल?

या फीचरचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा ग्राहकांना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. ग्राहकांना यासाठी ॲक्टिव्ह इंटरनेट कनेक्शनचीही गरज भासणार नाही. म्हणजेच, हे मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर सारखेच काम करेल मात्र यामध्ये दोन स्मार्टफोन एका डिव्हाईसला कनेक्ट केले जाऊ शकतात. तर मल्टी-डिव्हाइस फीचर्ससह, स्मार्टफोन व्यतिरिक्त, चार वेगवेगळ्या डिव्हाईस एकाच अकाउंटशी लिंक केली जाऊ शकतात.

काय आहे Wabetainfo चा रिपोर्ट

Wabetainfo ही मेसेजिंग अॅपच्या अपकमिंग फीचर्सबाबत माहिती देणारी वेबसाइट आहे. त्यांच्याकडून आपल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, यूजर्ससाठी आपला दुसरा फोन व्हॉट्सअॅप अकाउंटशी लिंक करणे सोपे होणार आहे. म्हणजेच, युजर्स दोन फोनवर एकच WhatsApp अकाउंट वापरू शकणार आहेत. युजर्स डेस्कटॉप, टॅब आणि इतर उपकरणांवरही आपल्या दुसर्या अकाउंटचा ॲक्सेस मिळवू शकणार आहेत. दरम्यान, हे फीचर सध्या केवळ डेव्हलपिंग स्टेजवर असून त्याला लवकरच प्रत्यक्ष वापरात आणले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, Wabetainfo च्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे, की जेव्हा युजर्स एखाद्या दुसर्या मोबाइलच्या डिव्हाइसवरून WhatsApp खात्यावर लॉग इन करतात तेव्हा त्यांच्या चॅट्स कॉमपेनियन डिव्हाइसवर सुरक्षितपणे कॉपी केल्या जातात.

फीचरला किती अवधी लागणार?

या फीचरशी निगडीत प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. व्हॉट्सअॅप वेब किंवा डेस्कटॉपवर उपलब्ध मेसेजिंग सिस्टम जोडण्यावर काम सुरु आहे. व्हॉट्सअॅपचे कंपेनियन मोड फीचर सध्या इन प्रोग्रेसमध्ये आहे. यामुळे ते रिलीज होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे हे फीचर प्रत्यक्षात कधी वापरात येणार याची उत्सूकता आता ग्राहकांना लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!