जबरदस्त फीचर्ससह, सॅमसंगने लाँच केला नवीन 4K स्मार्ट टीव्ही, किंमत पहा

Buisness Batmya
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे चित्रपट आणि कार्यक्रम पाहण्यासाठी बरेच लोक बाहेर न जाता घरातच टीव्ही बघण्याला पसंती देतात. त्यासाठी बहुतेक जण बाजारात नवीन टीव्हीच्या शोधात असतात. म्हणूनच तुमच्यासाठी सॅमसंगने आता नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून हा टीव्ही कमी किमतीत अप्रतिम फीचर्ससह येतो. चला तर मग याबद्द्ल जाणून घेऊया.With the awesome features, Samsung has launched a new 4K smart TV, see the price
स्वस्तात मस्त, ZTE कंपनीचे दोन स्मार्टफोन येताय बाजारात, पहा किंमत
दरम्यान हा टीव्ही खरेदी केल्यावर तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्यात तुम्ही जर Flipkart वरून Samsung Crystal 4K Neo TV खरेदी केला तर तुम्हाला Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.
तसेच हा स्मार्ट टीव्ही 43-इंचाच्या 4K डिस्प्लेसह लाँच करण्यात आला असून यामध्ये तुम्हाला HDR10+ सपोर्ट, बेझल-लेस डिझाइन आणि इमर्सिव अनुभव मिळणार. हा स्मार्ट टीव्ही शक्तिशाली क्रिस्टल प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑटो गेम मोड आणि मोशन एक्सलेटर सपोर्ट देखील दिला गेला आहे.
या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला डॉल्बी डिजिटल प्लसचा साउंड सपोर्ट दिला असल्यामुळे तुम्ही थ्रीडी आवाजाचाही आनंद घेऊ शकणार आहे. याशिवाय या टीव्हीमध्ये अॅडॉप्टिव्ह साउंड फीचर आणि एक उत्तम म्युझिक प्लेयर देखील देण्यात आला आहे. तसेच तुम्ही या टीव्हीमध्ये गाना अॅप देखील अॅक्सेस करू शकता.
डॉलरच्या तुलनेत रुपया 4.5 टक्कयांनी घसरला, सर्वसामान्यांना बसणार फटका