TATA च्या या शेअरने, गुंतवणूकदारांचे 1 लाखांचे झाले 82 लाख

buisness batmya
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून त्यात टाटा समूहाचा Tata Elxsi शेअर हा असाच एक स्टॉक आहे. ज्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
या IT शेअरने यावर्षी 42 टक्के परतावा दिला आहे. यात टाटा अलेक्सीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे जो आपल्या भागधारकांना बऱ्याच काळापासून चांगला परतावा देत आहे. तर मल्टीबॅगर स्टॉक हा गेल्या 9 वर्षात 102 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना अंदाजे 8,100 टक्के परतावा मिळाला.
Hyundai चे Grand i10 Nios चे नवीन CNG प्रकार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स
Tata Elxsi शेअर
दरम्यान Tata Elxsi च्या शेअरची किंमत वर्षभरात 5890 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत या स्टॉकमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात हा आयटी स्टॉक सुमारे 4250 वरून 8370 रुपयांवर गेला असून या कालावधीत सुमारे 95 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 875 वरून 8370 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत सुमारे 860 टक्क्यांनी झेप घेतली आहे.
Tata Alexi च्या शेअरच्या किमतीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 1.075 लाख झाले असते. तर 6 महिन्यांत ते 1.19 लाख झाले असते. तसेच एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी Tata च्या या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 9.60 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, 9 वर्षांपूर्वी गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 82 लाख झाले असते.
Samsung Galaxy Z Flip 4 या फोनची किंमत झाली लीक