आर्थिक

रिझर्व बँकेकडून निर्बंध असलेल्या या बँकेतून आता 5 लाखापर्यंत रक्कम येणार काढता

Buisness Batmya

मुंबई : सहकारी बॅंकेकडून ठेवीदारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आणली आहे. त्यात रिझर्व बँकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून ठेवीदारांना 5 लाखा पर्यंतच्या ठेवी काढता येणार आहे. त्यासाठी बॅंकेने आधीच मान्यता दिलेली आहे.Withdrawals up to Rs 5 lakh will now come from this bank which is restricted by the Reserve Bank

तसेच याकरता संबंधित ठेवीदारांने ठेवी परत मिळण्याबाबतचा अर्ज बँकेच्या शाखेत करणं आवश्यक आहे. म्हणूनच अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान याआधी या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून बॅंक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश देण्यात आला असून  मे 2021 मध्ये दिला होता.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स जोराने कोसळले

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मात्र शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी गंभीर ताशेरे ओढले होते. त्यात दिवाळखोरीची कारवाई का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे या बॅंकेवर आर्थिक निर्बंध देखील घालण्यात आले होते.

कारण बँकेकडे किमान भांडवल देखील नसल्यामुळे आपल्या ठेवीदारांने पैसे देण्याच्या स्थितीतही बँक नव्हती. मात्र आता तो गेल्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.

जगातील सर्वात जास्त बॅटरी असणारा स्मार्टफोन होणार लॉन्च, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!