bank account तुमचे बॅंक खातं ब्लॅाक करण्यात आलयं

business batmya
नवी दिल्लीः सध्या भारत देशामध्ये काम करणाऱ्या पेक्षा सॉरी लुटमारी करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यातल्या त्यात ऑनलाईन पद्धतीने टाकणार यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे त्यामुळे सध्या अनेक लोकांच्या मोबाईल वरती तुमचं बँक खातं बंद करण्यात आलेला आहे किंवा तुमचं बँक खाते ब्लॉक करण्यात आलेला असे मेसेज प्राप्त होत आहे यामुळे जनता घाबरून जात आहे मात्र याद्वारे काय घडलं हे आपण पाहणार आहे. ( Your bank account has been closed, you received this message )
सध्या अनेक लोकांच्या मोबाईल SBI बॅंकेच्या नावाने मेसज मिळत आहे. यामध्ये लबाड लोक व घोटाळा करणारे एक मजकूर पाठवत आहेत, ज्यात लिहिले आहे की “प्रिय खातेधारक तुमच्या एसबीआय बँकेच्या कागदपत्रांची मुदत संपली आहे किंवा तुमचे KYC अपडेट केले नाही त्यामुळे खाते ब्लॉक केले जाईल.
भारतातील बर्याच लोकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये त्यांची बँक खाती उघडली असल्याने, संदेशामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते. फेक मेसेजसोबत एक लिंकही जोडली आहे. दस्तऐवज अपलोड करण्यासाठी ग्राहकांना एक लिंक वापरायची आहे असे सांगितले जाते. पण जर आपण अश्या पध्दतीने लिंक केलं केलं तर तुमचा कार्यक्रम होऊन जाईल व सर्व पैसा जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपण अशा येणा-या कोणत्याही लिंकवरती क्लिक करु नये. असे आवाहन SBI मार्फत देशातील ग्राहकांना करण्यात आले आहे .फसवणुकीच्या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ग्राहकांनी घाबरून जावू नये.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एक तथ्य तपासणी प्रकाशित केली आहे ज्यात दावा केला आहे की संदेश बनावट आहे. भामटे लोक अश्या पध्दतीने मे्सज पाठवत आहे. मात्र या मेसज मध्ये कोणतेही सत्य नाही.
पीएबीच्या म्हणण्या नुसार आपण अशा कोणत्याच मेसज किंवा मेलला प्रतिउत्तर देऊ नये. हेच आपल्या हितासाठी चांगलं राहणारे आहे. कारण यात तुमची फसवणूक होऊ शकते. जर असे मेसज आपल्याला आले तर आपण त्वरीत याची तक्रार करणे गरजेचे आहे. जेणे करुन इतरांची फसवणूक होऊ शकतं नाही.
A message in circulation claiming that your @TheOfficialSBI account has been blocked is #FAKE #PIBFactCheck
▶️ Do not respond to emails/SMS asking to share your personal or banking details.
▶️ If you receive any such message, report immediately at report.phishing@sbi.co.in pic.twitter.com/HXj8Tz1svh
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 6, 2022
भारतात व इतर राज्यामध्ये असे अनेक लोक सक्रिय असून ते यातून घोटाळे करतात. त्यामुळे आपण यावर सावधानता बाळगली पाहिजेत.