Electric Bike एकदा चार्ज करुन एवढ्या किलोमीटर पळणार तुमची Hero Splendor

business batmya
मुंबईः Electric Bike दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर यामुळे सर्वजण मेटाकुटीला आलेले आहेत कारण प्रत्येक क्षणाला दुचाकीची गरज आपल्याला भासते. कारण वाढते कामांची संख्या तसेच धावपळ आणि वेळ नसल्यामुळे आपण प्रत्येक वेळी दुचाकीचा वापर करतो मात्र दुचाकी मध्ये पेट्रोल टाकणा महाग होत असल्यामुळे लोक इलेक्ट्रिक बाइक चा विचार करत आहेत.
त्यामध्ये सांगायचं झालं तर हिरो स्प्लेंडर कंपनीची बाईक आपल्यासाठी चांगली राहिली. ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर प्रचंड प्रमाणात दूर जाते याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो जाणून घेऊया या इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडर बाईक कशी करता येईल. (Your Hero Splendor will run this many kilometers by charging an electric bike once )
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रदूषण कमी करण्यासाठी आता अनेक वाहने इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आणली जात आहेत. आकडेवारीनुसार, कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये 1,50,000 लाख इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली होती.
अलीकडेच, GoGoA1 ने हिरो स्प्लेंडरचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर केले आहे. GoGoA1 च्या EV किटची किंमत 35,000 रुपये आहे. हे किट सिंगल चार्जवर 151 किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.एकदा चार्ज करुन 151 किलोमीटर ती जाऊ शखते.
मोटारसायकलसाठी, कंपनीला गेल्या काही महिन्यांत 60 टक्के मागणी आहे. कंपनी मोटरसायकलसाठी आरटीओ इलेक्ट्रिक मान्यताप्राप्त किट देते.
GoGoA1 पेट्रोलवर चालणाऱ्या दोन, तीन आणि चार चाकी वाहनांना बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचे काम करत आहे. GoGoA1 सध्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथे कार्यरत आहे. याव्यतिरिक्त, कंट्रोलर आणि मोटर 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात.
मोटारसायकलला नवीन नंबर प्लेट दिली जाईल जी किटमध्ये बसवल्यानंतर हिरव्या रंगाची असेल. या किटचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित होणारी वाहने स्क्रॅप करण्याची गरज भासणार नाही.