Daily News

नांदगाव मध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

नांदगाव मध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू Youth dies due to electric shock in Nandgaon

बिझनेस बातम्या / मारुती जगधने

नांदगाव, ता. 26 आॅक्टोबर 2024- नाशिक जिल्ह्यात विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना वाढत आहेत. विजेच्या वायरिंगमधील तांत्रिक समस्या, अयोग्य देखरेख, वीजेची तार तुटणे किंवा फॉल्ट्स यामुळे शेतकऱ्यांना दुर्घटनांचा सामना करावा लागत आहे.

शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना विजेच्या तारा ओलांडाव्या लागतात, ज्यामुळे हे अपघात घडत आहेत. या समस्येवर सरकारने गंभीर दखल घेऊन विद्युत वितरण यंत्रणा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांना सुरक्षिततेचे साधन, जसे कि इन्सुलेटेड हँडल्स आणि इतर सुविधा पुरवण्याची गरज आहे, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.

नाशिक जिल्ह्यात विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या आकडेवारीनुसार, शेतीकाम करताना लोंबकळलेल्या विजेच्या तारा आणि शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांना विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. येवल्याच्या भिंगारे गावात एक शेतकरी विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मृत्युमुखी पडला, तर देवळा तालुक्यात दोन तरुण शेतकऱ्यांचा असाच मृत्यू झाला आहे.

अनेकदा या घटनांमध्ये वीजवाहिन्या योग्यरित्या दुरुस्त न केल्यामुळे किंवा लोंबकळणाऱ्या ताऱ्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन विजेचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या धक्क्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी शासकीय उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.दरम्यान नांदगांव तालुक्यात दि २४ च्या मध्यराञी बाणगंव ता.नांदगांव येथील तरुण शेतकरी व नांदगांव बाजार समितीत मापारी म्हणून काम करणारा विकास ज्ञानदेव कवडे वय ३२ हा शेतकरी राञी बाणगांव शिवारात लागवड केलेल्या कांदा पिकाला पाणी देण्यास गेला तेव्हा कृषी पंपचालु करताना त्याला विजेचा जबर शाॅक लागल्याने तो जागेवरच गत प्राण झाला.

या घटनेने कवडे कुटुंबावर शोखाळा पसरली आहे बाणगांव चे पोलीस पाटील ज्ञानदेव परशराम कवडे यांचा तो लहान व लाडका मुलगा होता.त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!