टेक

What’s App ने सुरु केले भारतीयांचे खाते लॅाक करण्याचे काम

business batmya

मुंबईः What’s App व्हाट्सअप प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे झाले आहे, मात्र आता व्हाट्सअप भारतीयांच्या अकाउंट बंद करत आहे. त्यामागे फार मोठं कारण आहे. जर तुम्ही व्हाट्सअप चा गैरवापर करत असाल  आणि तो गैरवापर म्हणजे कशा पद्धतीने तेही आपण जाणून घेतले पाहिजेत.  तुमचे  व्हाट्सअप लवकरचं बंद होईल यासाठी फेसबुक टीम काम करत आहे. जर आपलं व्हाट्सअप सुरळीत सुरू राहावं असा आपल्याला वाटत असेल तर ही बातमी आपल्यासाठी आहे.

WhatsApp ने भारतामध्ये जानेवारी माहिन्यामध्ये लाखो अकाऊंट्स बॅन केले. नव्या रिपोर्टनुसार WhatsApp ने जानेवारीमध्ये १८ लाख पेक्षा जास्त लोकांचे अकाऊंटस् बॅन केले आहे. या अकाऊंटला १ जानेवारी २०२२ पासून ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बॅन केले गेले आहे.

Meta मालकी असलेल्या मेसजिंग प्लॅटफॉर्मबाबतचा रिपोर्ट प्रत्येक महिन्याला रिपोर्ट जाहीर करतो. या अकाऊंट्सवर WhatsApp कंपनीच्या नियमांना मान न केल्यास बॅन केले जाते म्हणजेच जे अकाऊंट कपनीच्या पॉलिसीविरुध्द जातील त्यांना बॅन केले जाते.

त्याशिवाय जर अकाऊंट्सबाबत कंपनीला कंप्लेंट मिळल्यास अकाऊंट बॅन केले जाते. तक्रार निवारणसाठी (Grievance Redressal) WhatsApp ला एकूण २८५ रिक्वेस्ट आल्या होत्या. त्यापैकी व्हॉट्सअॅपने २४ अकाऊंट्स बॅन केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १८,५८,००० अकाऊंटला जानेवारी महिन्यात बॅन करण्यात आले. WhatsApp ने अकाऊंट्सला प्लॅटफॉर्मला हार्म बिहेव्हियरपासून वाचविण्यासाठी बॅन करते. WhatsAppचा दावा आहे की, कोणतेही हार्मफुल बिहेव्हियर होण्या आधीच ते थांबवतात.

Whats App चे अॅब्यूज डिटेक्शन अकाऊंट बॅन करण्यामुळे प्रायमरी पॅरामीटर, अॅब्यूज डिटेक्शन पॅरामीटर कोणत्याही अकाऊंटमध्ये तीन स्टेजवर ऑपरेट होते. त्यामध्ये रजिस्ट्रेशनच्या वेळी लाईफस्टाईल, मेसेजिंग आणि निगेटिव्ह फिडबॅकबाबत रिस्पॉन्स समाविष्ट आहे.

WhatsAppने कोणतीही पूर्वसूचना न देता अकाऊंट बॅन करू शकते. जर तुमचे अकाऊंट बॅन झाले तर तुम्हाला व्हॉटस् अॅप वर “Your phone number is banned from using WhatsApp. Contact support for help” असा संदेश स्क्रिनवर दिसेल. तुम्हाला जर असे वाटत असेल की चुकून तुमचे अकाऊंट बॅन झाले आहे तर त्यासाठी तुम्ही कंपनीला मेल पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!