या शेअरने गुंतवणुकदारांचे १ लाखाचे झाले ७ लाखांहून अधिक

Buisness Batmya
सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मालामाल करणारे अनेक स्टॅाक उपलब्ध आहेत. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे जीएम पॉलीप्लास्ट या स्टॉकने केवळ नऊ महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एप्रिल 2022 मध्ये या शेअरची किंमत केवळ 25 रुपये होती, आता हा शेअर 200 रुपयांच्याही पुढे गेला आहे.
या बँकेचे कर्ज झाले महाग, जाणून घ्या नवीन दर
तर गेल्या वर्षाच्या म्हणजेच 2022 च्या शेवटच्या महिन्यात या शेअरला मिळालेला रॉकेट स्पीड अद्यापही कायम असून या स्टॅाकने जीएम पॉलीप्लास्ट या प्लॅस्टिक उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. तर या स्टॉकने आपल्या गुतंवणूकदारांना एकावर्षात 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला असून गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 692 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.
हा शेअर एप्रिल 2022 च्या सुरुवातीला केवळ 25 रुपयांवर होता. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत यात साधारण वाढ झाल्याचे दिसून आले असून 16 सप्टेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत 50 रुपयांवर पोहोचली. मात्र, गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या शेअरने रॉकेट स्पीड घेतला असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 80 रुपयांवर पोहोचला आहे.
जगात रुपया वाढणार, डॉलरची दादागिरी संपणार, या बॅंकेने तयार केली मोठी योजना
तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये या शेअरने 100 चा आकडाही ओलांडला असून 25 नोव्हेंबरला हा शेअर 142 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर 30 डिसेंबरला हा शेअर 175 रुपयांवर गेला. तर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवसात म्हणजेच शुक्रवारी हा शेअर टक्यांच्या वाढीसह 202 रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्याने या शेअरमध्ये नऊ महिन्यांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती टिकवून ठेवली असेल, त्याचे आज 7 लाखांपेक्षाही अधिक झाले असणार.
या कंपनीने गुंतवणूकदारांना 12 दिवसांत दिला दुप्पट परतावा



