Omicron : शाळा पुन्हा बंद होणार?, शिक्षणमंत्री काय म्हणतात

business batmya
मुंबईः
मुंबई : आता राज्यातही Omicronचे रुग्ण वाढत आहे. हे लक्षात घेता मुंबईतल्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच तर शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
Omicron variant : देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ओमायक्रॉनमुळे देशात रोज 14 लाख नवे रूग्ण आढळण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कडक निर्बंधाच्या सूचना केल्या आहेत.
नाशिक आणि नवी मुंबईत शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु ठेवणार का, याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सुरु झालेल्या शाळा बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
दरम्यान, नाशिकमधल्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला एक मुलगा बाधित आढळला. त्यामुळे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी अशा 90जणांच्या टेस्ट केल्यायत. त्यांचे अहवाल येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला.