सेन्सेक्समध्ये 1329 अंकाची तेजीःशेयर बाजार उसळला एवढ्या कोटींचा नफा

business batmya
नवी दिल्ली– The stock market surged to a profit of crores आज (शुक्रवारी) दोन्ही निर्देशांक सेंन्सेक्स आणि निफ्टी यांची कामगिरी समाधानकारक राहिली. सेंन्सेक्सवर (SENSEX) 1300 अंकांहून अधिक तेजी राहिली.तर निफ्टीनं 16650 चा टप्पा पार केला. आज शेअर बाजारात खरेदी चित्र दिसून आलं.
रशिया व युक्रेनमुळ (RUSSIA-UKRANE CRISIS) युद्धाच्या तणावपूर्ण स्थिती शेअर बाजारात तेजीचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीच्या सत्रानंतर तेजीमुळे गुंतवणुकदारांत उत्साह संचारला. (The stock market surged to a profit of crores )
टाटा स्टील(TATASTEE)L,इंड्सइंड बँक (INDUSINDBK),एम अँड एम( M&M), बजाज फायनान्स (BAJFINANCE),एनटीपीसी (NTPC),टेकएम (TECHM) आणि अक्सिस बँक (AXISBANK) आजचे टॉप गेनर्स ठरले. शेअर बाजारात गुंतवणुकदारांना 8 लाख कोटी रुपयांचा नफा झाला.
पीएसयू बँक इंडेक्सवर 4 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. आज (शुक्रवारी) सेंन्सेक्स 1329 अंकांच्या तेजीसह 55,858.52 वर बंद झाला.तर निफ्टी 410 अंकांच्या वाढीसह 16658 वर पोहोचला. सेन्सेक्सवर 30 पैकी 29 शेअरची कामगिरी दमदार राहिली बँक (BANK INDEX) आणि फायनान्शियल्स शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. निफ्टी वर बँक आणि फायनान्शियल्स इंडेक्स 3 टक्क्यांहून अधिक तेजी राहिली.
आजचे वधारणीचे शेअर्स (TOP GAINERS )
कोल इंडिया (8.97%)
टाटा मोटर्स (7.43%)
टाटा स्टील (6.64%)
अदानी स्पोर्ट्स (6.15%)
इंड्सइंड बँक (5.87%)
आजचे घसरणीचे शेअर्स (TOP LOOSERS)
• ब्रिटानिया (-0.67%)
• नेस्ले (-0.17%)
• एचयूएल (-0.03%)
अदानी पॉवर तेजीत
अदानी पॉवर (Adani Power) शेअरमध्ये आज तेजी नोंदविली गेली. 12 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. शेअर 128 रुपयांवर पोहोचला. काल (गुरुवारी) शेअर 111 रुपयांवर बंद झाला होता. सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात निकाल अदानीच्या बाजूने लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानातील अन्य तीन कंपन्यांना भाडे अदानीला वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.



