GOLD RATE महाराष्ट्रात सोनं आलं खाली, एवढ्या रुपयांची झाली घसरण

business batmya
मुंबईः GOLD RATE सोनं आणि चांदी चा भाव वरती आपण दररोज लक्ष ठेवले पाहिजेत, कारण सोन्याचे भाव रोज खाली वर होत असतात त्यामुळे सोन्यावर अनेक लोकांच्या नजरा असतात कारण अनेक लोक सोनं खरेदी करून त्यातून मोठी कमाई करत आहे. कारण कमी भावात सोनं खरेदी करून त्याची किंमत भविष्यात वाढणारी असल्यामुळे लोक सोन्याचा बाजार यावर लक्ष ठेवून असतात आता महाराष्ट्रात सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. ( In Maharashtra, gold came down, so much so that the rupee fell )
मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46850 व 24 कॅरेट सोन्याला 51110 रुपये भाव मिळाला.तर (शुक्रवारी) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या (MAJOR CITIES GOLD RATE) भावात सरासरी 400 रुपयांची घसरण नोंदविली गेली.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :
• मुंबई- 51,110 रुपये (440घट)
• पुणे- 51,200 रुपये (400घट)
• नागपूर- 51,250 रुपये (350घट)
• नाशिक- 51,200 रुपये (400घट)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):
• मुंबई- 46,850 रुपये (400 घट)
• पुणे- 46,900 रुपये (400 घट)
• नागपूर- 46,980 रुपये ( 320घट)
• नाशिक- 46,900 रुपये (400 घट)
सोनं खरेदीची हीच वेळ?
युक्रेन-रशिया वादामुळं शेअर बाजारासह सुवर्ण बाजाराला मोठा फटका बसला आहे. दोलायमानं बाजाराच्या अवस्थेमुळं गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे. सोने गुंतवणुकदारही धास्तावले आहेत. तेजी-घसरणीच्या आलेखामुळं सोने-बाजार स्थिर होण्याच्या प्रतीक्षेत गुंतवणुकदार आहेत.



