आर्थिक

बाजारात बनावट नोटांचे थैमान….

वेगवान नाशिक

मुंबईः  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बनावट नोटा दुपटीनं सक्रिय झाल्या आहेत. वैध चलनासोबत वापरासाठी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करणाऱ्या 500 व 2000 रुपयांच्या बनावट नोटा ) जप्त करण्यात आल्या आहेत.

बनावट नोटांना आळा घालण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न हाती घेण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेचं  बनावट नोटांना पायबंद घालण्याचे प्रयत्न अपुरं ठरल्याचं चित्र समोर आलं आहे.

वर्ष 2021-22 मध्ये 500 रुपयांच्या 79,669 बनावट नोटा बँकिंग व्यवहारादरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत. वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 13,604 वर पोहोचली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 56.6 टक्क्यांहून अधिक आहे.

रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालातून बनावट नोटांचं चलनातील स्थान दिसून आलं आहे. समान अहवालात 500 रुपयांची नोटेचा सर्वाधिक वापर केला जातो. तर 2000 रुपयांची नोट सर्वात कमी वेळा वापरली जाते. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, वर्ष 2020-21 मध्ये बनावट नोटांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, वर्ष 2021-22 मध्ये बनावट नोटांची संख्या वाढली होती.

अहवालात नेमकं काय म्हटलयं-

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 रुपये, 20 रुपये, 200 रुपये, 2000 रुपयांच्या श्रेणीत बनावट नोटांचे प्रमाण अनुक्रमे  16.4 टक्के, 16.5 टक्के, 11.7 टक्के, 101.9 टक्के, 54.6 टक्के आढळून आले. चलनी नोटांच्या सुरक्षित प्रिंटिंगवर रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमामात खर्च केला. गेल्या वित्तीय वर्षात आरबीआयने 4,984.80 कोटी रुपये खर्च केले. सुरक्षित उपायांचा सर्व शक्यतेचा विचार करुनही बनावट नोटांचा आळा घालण्यात अपयश आले आहे. 500 व 2000 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!