विमा/कर्ज

जागतिक बँक भारताला एक अब्ज डॉलर कर्ज देणार

The World Bank will lend one billion dollars to India

जागतिक बँकेने (World Bank) भारताला (India) मोठी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. जागतिक बँकेने भारताला एक अब्ज डॉलर कर्ज मंजूर केलं आहे. जागतिक बँक आणि भारताने शुक्रवारी देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकी 500 दशलक्ष डॉलर्सच्या दोन कर्जांवर (Complementary Loans) स्वाक्षरी केली. एवढी मोठी रक्कम कुठे आणि कशी वापरली जाईल हे जाणून घ्या.

आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणार
बहुपक्षीय एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एक अब्ज डॉलर कर्जाच्या निधीचा उपयोग वित्त पुरवठ्यासाठी वापरलं जाईल. देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जागतिक बँक भारताच्या पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला (PM-ABHIM) पाठिंबा देईल. यामुळे देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होईल.

जगभरात आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर
कोरोना महामारीनंतर भारतातच नाही तर जगभरातील देशांकडून आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोरोनामुळे जगाने धडा घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक देश आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारतानेही कोरोनाकाळात आरोग्य सुविधांना लक्ष केलं. लस उत्पादन करत भारताने इतर देशांना लसींचा तसेच औषधांचाही पुरवठा केला. आता आरोग्य यंत्रणा अधिक प्रगत बनवण्यासाठी भारत जागतिक बँकेकडून कर्ज घेणार आहे.

‘या’ राज्यांना लाभ मिळणार
जागतिक बँकेच्या निवेदनानुसार, भारत आणि जागतिक बँक यांच्यात हा करार झाला. रजत कुमार मिश्रा, आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आणि ऑगस्टे तानो कुमे (Auguste Tano Kome) यांनी करारावर स्वाक्षरी केली. ऑगस्टे तानो कुमे यांनी यावेळी म्हटलं की, कोविड-19 महामारीनंतर जगभरात महामारी विरोधात लढण्याच्या तयारीसाठी आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. साथीच्या रोगाशी लढण्याची तयारी ही जागतिक जनहिताची आवश्यक बाब आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा भारतातील प्रामुख्याने सात राज्यांना या कर्जाचा लाभ मिळणार असून देशभरातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल. यामध्ये आंध्र प्रदेश, केरळ, मेघालय, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेला प्राधान्य दिले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!