या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान, रोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स

Buisness Batmya
नवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या यूजर्ससाठी कंपनीने अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही २ जीबी डेटाचे स्वस्त प्लान शोधत असतील तर त्यांना अनेक रिचार्ज प्लान मिळतील. या प्लानमध्ये आवश्यकतेनुसार, बेनिफिट्स दिले असून तुम्हाला दररोज २ जीबी डेटा हवा असेल तर कंपनीच्या दोन प्लान संबंधी या ठिकाणी माहिती दिली आहे. जाणून घेऊया.
Share Market: भारतीय शेअर बाजार तेजीत सुरूवात, सेन्सेक्स पुन्हा 61 हजारांच्या वर
रिलायन्स जिओकडे २ जीबी डेटा रोज मिळणारे ५ प्रीपेड प्लान असून या प्लानची सुरुवात २४९ रुपयांपासून होते. २ जीबी डेटा रोज ऑफर करणाऱ्या सर्वात महाग प्लानची किंमत २ हजार ८७९ रुपये आहे. या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. तसेच जिओच्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा ऑफर केला जातो.
तसेच रिलायन्स जिओचा २९९ रुपयाच्या प्लानची वैधता २८ दिवसाची असून या प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ५६ जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळतो. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जात असून जिओ ग्राहक देशात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा फायदा घेवू शकतात. या प्लानमध्ये १०० एसएमएस रोज मिळते.
तसेच जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी, जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जात असून ५जीचा वापर करणाऱ्या ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा दिला जातो.
त्यानंतर रिलायन्स जिओच्या या प्लानची वैधता २३ दिवसाची असून या प्लानमध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा रोज दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४६ जीबी डेटा या रिचार्ज प्लानमध्ये मिळू शकतो. या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जात असून या रिचार्ज प्लानमध्ये देशात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री मिळते. सोबत १०० एसएमएसचा फायदा मिळतो.



