खाद्य तेलाच्या दरात घसरण

Buisness Batmya
मुंबई : देशातील जनतेला सरकारकडून पुन्हा मोठा दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा कमी होणार असून याबाबत सरकार आज तेल उत्पादक आणि निर्यातदारांची बैठक घेणार आहे. ज्यामध्ये तेलाच्या किमती कमी करण्यावर चर्चा होणार आहे.
गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत कपात केल्यानंतर पुन्हा एकदा खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीत या कमतरतेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, असा सरकारचा मानस आहे. म्हणूनच आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro या दिवशी भारतात होणार लॉन्च
याआधीही खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे 10 ते 15 रुपयांनी कपात करण्यात आली होती. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काही देशांनी खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता बंदी उठवल्यानंतर हे तेल बाजारात आल्यावर घसरण झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे पीकही बाजारात येणार असल्यामुळे ही किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
तसेच देशभरात शेंगदाणा तेल वगळता पॅकेज केलेल्या खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती 15-20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यावेळी त्याची किंमत 150 ते 190 रुपये किलोपर्यंत खाली आली होती. तर आता त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
एलआयसीच्या शेअरधारकांना मिळणार लाभांश, कंपनीने रेकॉर्ड डेट केली जाहीर



