उद्योग / व्यवसाय

LIC ग्राहकांसाठी खुशखबर, भारतीय आयुर्विमा महामंडळने पॅालिसीधारकांसाठी आणली ही योजना

Buisness Batmya

अनेक जण विमा योजना घेण्याचा विचार करत असताना दिसतात. त्यात तुम्ही पण विमा योजना घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तर आता देशातील सर्वात मोठी असलेली विमा कंपनी LIC ग्राहकांना सुरक्षित आणि चांगला परतावा असलेल्या योजना देत असते. अशीच एक एलआयसीची योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.Good news for LIC customers, Life Insurance Corporation of India has introduced this scheme for policyholders.

तसेच ‘LIC सरल पेन्शन योजना.’ ही स्कीम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असून ही एक नॉन-लिंक, सिंगल प्रीमियम वार्षिकी योजना आहे. तर हा प्लॅन जोडीदारासोबतही घेता येतो. चला मग जाणून घेऊ या प्लॅनची माहिती..

भारतीय आयुर्विमा महामंडळ ने नागरिकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली. या पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त एकदाच प्रीमियम भरून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवू शकता. तसेच या योजनेअंतर्गत, तुम्ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला ही पॉलिसी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने देखील खरेदी करता येईल.

या वर्षाच्या अखेरीस 5 जी सेवा 20-25 शहरांमध्ये सुरु होईल

दरम्यान LIC च्या सरल पेन्शन प्लॅन पॉलिसीधारकास 12,000 रुपये मासिक पेन्शन मिळत असून, या योजनेअंतर्गत किमान वार्षिकी 12,000 रुपये प्रतिवर्ष आहे.तसेच किमान खरेदी किंमत वार्षिकी मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असेल. त्यामुळे कमाल खरेदी किंमतीवर मर्यादा नसून ही योजना 40 ते 80 वर्षे वयोगटासाठी उपलब्ध आहे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3000 गुंतवावे लागतील. एलआयसीच्या या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर दोन उपलब्ध पर्यायांमधून वार्षिकी निवडण्याचा पर्याय आहे. त्यात दुसरा पर्याय म्हणजे पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळणार असून, त्यांच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला देखील आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे.

8 हजार रुपयांपेक्षा स्वस्त झाला हा स्मार्टफोन, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!