टु- व्हिलरपासून ते गॅझेटपर्यंत सर्वच गोष्टींवर उत्तम ऑफर्स, स्वस्तात काय मिळतंय कुठे?

Buisness Batmya
नवी दिल्लीः आज 26 जानेवारी रोजी भारतात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी Amazon आणि Flipkart सारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या अनेक उत्पादनांवर मोठ्या ऑफर्स देत आहेत.
वास्तविक, 26 जानेवारीच्या खास निमित्ताने लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. अशा परिस्थितीत सर्व कंपन्या याकडे आपली विक्री वाढवण्याची एक चांगली संधी म्हणून पाहतात. चला जाणून घेऊया कुठे काय स्वस्त मिळते.
Gold Price सोने झाले स्वस्त, जाणून घ्या चांदीचा दर
बजाज मॉल -16 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे. ऑफर-5,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात असून सर्व प्रकारच्या दुचाकींवर परवडणारे EMI पर्याय दिले जात आहेत. विजय सेल्स मेगा रिपब्लिक डे सेल 22 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे. ऑफर- उत्पादनांवर 65 टक्के सूट दिली जात आहे. तर गॅजेट्स, होम आणि किचन अप्लायन्सेस आणि एंटरटेनमेंट प्रोडक्ट्सवरही ऑफर्स दिल्या जात आहेत.
क्रोमा प्रजासत्ताक दिन विक्री19 जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल 29 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ऑफर-येथे लेटेस्ट स्मार्टफोन्सवर सूट दिली जात असून यासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही सूट दिली जात आहे. TCL प्रजासत्ताक दिन विक्री हा सेल 15 जानेवारीपासून सुरू झाला असून 30 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ऑफर-येथे स्मार्ट टीव्ही, एलईडी टीव्ही आणि मिनी एलईडी टीव्ही मॉडेल्सवर 55 टक्के सूट दिली जात आहे. तर काही निवडक उत्पादनांवर 10 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.
या कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का! सर्वात स्वस्त प्लॅनचे रिचार्ज झाले महाग