HDFC लाइफ देणार आतापर्यंतचा सर्वोच्च बोनस, 5.87 लाख पॉलिसीधारकांना होणार फायदा

Buisness Batmya
मुंबईः HDFC Life ने त्यांच्या सहभागी योजनांवर आतापर्यंतची सर्वोच्च बोनस ऑफर जाहीर केली आहे. एप्रिल 2022 मध्ये झालेल्या कंपनीच्या बोर्ड बैठकीत 2465 कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा करण्यात आली होती. तर 5.87 लाख पॉलिसीधारक या बोनससाठी पात्र आहेत. त्यात एकूण 2465 कोटी रुपयांपैकी 1,803 कोटी रुपये या आर्थिक वर्षात परिपक्व पॉलिसींवर बोनस किंवा रोख बोनस म्हणून दिले जातील. तर उर्वरित बोनसची रक्कम भविष्यात दिली जाईल.HDFC Life will offer the highest ever bonus, benefiting 5.87 lakh policyholders
राकेश झुनझुनवाला यांचा जादूई स्टॉक! ‘या’ शेअरने 1 लाखांचे केले 5 कोटी
तसेच एचडीएफसी लाइफ ही भारतातील अग्रगण्य गृहनिर्माण वित्त संस्था एचडीएफसी लिमिटेड आणि जागतिक गुंतवणूक कंपनी एबर्डन (मॉरिशस होल्डिंग्ज) 2006 लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. तर सन 2000 मध्ये स्थापना केलेली HDFC Life ही भारतातील आघाडीची आणि सूचीबद्ध कंपनी आहे.
दरम्यान ही कंपनी दीर्घकालीन जीवन विम्याची सेवा प्रदान करते. व आपल्या ग्राहकांना वैयक्तिक आणि समूह विम्याची विस्तृत श्रेणी देते. यामध्ये सुरक्षा, पेन्शन, बचत, गुंतवणूक आणि आरोग्य अशा विविध सेवा उपलब्ध आहेत. तसेच 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 39 वैयक्तिक आणि 13 गट उत्पादने होती. एचडीएफसी लाइफच्या ३७२ शाखा आहेत ज्यामुळे ती मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एचडीएफसी लाइफमध्ये सुमारे 300 भागीदारी आहेत, ज्यात एनबीएफसी, एमएफआय आणि एसएफबी सारख्या पारंपारिक भागीदारांचा समावेश आहे.
जर तुम्ही आज हे काम केले नसेल, तर तुम्ही या तारखेपासून शेअर बाजारात व्यवहार नाही करू शकणार



