खाद्यतेलाचे भाव भडकले भारताला मोजावे लागणार जास्त पैसे

business batmya
नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असून, प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले आहेत.होळीपूर्वीच महागाईचा (Inflation) भडका उडताना दिसून येत आहे. India will have to pay more as edible oil prices skyrocket
सोयाबीन, सुर्यफूल, शेंगदाना अशा सर्वच तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मोहरीच्या तेलाने तर दोनशे रुपयांचा टप्पा पार कला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाची पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने येणाऱ्या काळात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान दुसरीकडे खाद्यतेलाच्या (Edible Oil) दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये खाद्य तेलाच्या किमती प्रति लिटर मागे 20 ते 25 रुपयांनी वाढल्या आहेत.
आयातीवर परिणाम
पाम ऑईल आपण इंडोनेशियाकडून आयात करतो. जवळपास साठ टक्के पाम ऑईल एकटा इंडोनेशिया भारताला पुरवतो. तर सुर्यफूल तेल आपण रशिया आणि युक्रेनकडून आयात करतो. यातील जवळपास सत्तर टक्के सुर्यफूल तेलाची आयात आपण युक्रेनकडून करतो. तर वीस टक्के सुर्यफूल तेलाचा पुरवठा आपल्याला रशियाकडून होतो. तर दहा टक्के तेल आपण आर्जेंटिनाकडून आयात करतो. भारतात सरासरी 65 टक्के तेलाची आयात केली जाते.
तेलाचा पुरवठा होत नसल्याने तेलाचे दर वाढले आहेत. येत्या काळात तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कळत न कळत याचा भारतावर मोठा परिणाम होत आहे.



