Lava चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

Buisness Batmya
भारतात लावा स्मार्टफोन आपल्या बजेटबाबत खूप लोकप्रिय असून, ही कंपनी फक्त बजेट केंद्रित फोन ऑफर करते, आणि अलीकडेच या कंपनीने Lava Z3 लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 8,499 रुपये आहे. भारतात आता Lava आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून यावेळी खास गोष्ट अशी आहे की आगामी फोनमध्ये बॅक पॅनल दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हा सर्वात स्वस्त ग्लास पॅनेल फोन असेल.Lava’s cheapest smartphone will be launched in India soon
जबरदस्त फीचर्ससह, सॅमसंगने लाँच केला नवीन 4K स्मार्ट टीव्ही, किंमत पहा
रिपोर्टनुसार, लावाचा नवीन फोन एलसीडी पॅनल आणि स्टँडर्ड रिफ्रेश रेटसह येईल. हा फोन 4G LTE असेल आणि तो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. या फोनमध्ये Unisoc चिपसेट उपलब्ध असेल. तसेच फोनमध्ये 4GB RAM आणि 32GB स्टोरेज असेल आणि असेही सांगितले जात आहे की ते अतिरिक्त स्टोरेज विस्तारासह येणार आहे.
Lava ने गेल्या वर्षी 5G डिव्हाइस Lava Agni 5G लाँच केले आणि त्याची किंमत 19,999 रुपये आहे, जी त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी आहे. तर हा फोन 6.7-इंचाच्या फुल HD+ डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आणि कॉर्निंग ग्लोब 3 संरक्षण आहे. तसेच याचा कॅमेरा हा 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे, ज्यामध्ये f/1.79 सिक्स-पीस लेन्स आहे. याशिवाय कॅमेरामध्ये 15-मेगापिक्सलचा वाईड अँगल शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
Lava Agni-5G मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला असून पॉवरसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
शेअर बाजार घसरला…, Nifty 15,800 वर तर Sensex 1456 अंकांनी घसरला



