आता होंडाची ही कार पेट्रोलवरच नाही तर इलेक्ट्रिकवरही धावणार

buisness batmya
नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली कारहोंडा सिटीची हायब्रीड व्हर्जन e:HEV आज लॉंच होणार आहे. तर ही कार फक्त पेट्रोलवरच चालणारी नसून, इलेक्ट्रिकवरही धावणार आहे. त्यामुळे ही कार शानदार मायलेज देणारी आसणार आहे. तसेच या कारमध्ये असणारी अनेक फिचर्स हे लॅांच झाल्यावरच कळणार आहे.Now this Honda car will run not only on petrol but also on electric
दरम्यान , ही कार गेल्या वर्षी आलेल्या पाचव्या पिढीच्या Honda City सारखीच असणार असल्याने , e:HEV चा बॅज मागील बाजूस अपडेट केला जाणार आहे. तर दुसरीकडे या कारचे दोन ट्रिम V आणि ZX येऊ शकतात. त्यामुळे कंपनीच्या डीलर्सकडून बुकिंग घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, कारची किंमत जवळपास 18 लाख रुपये असू शकते.
Today’s petrol and diesel rates आजचे पेट्रोल डिझेल दर..महाराष्ट्रात 120 च्या पुढे
या कारमध्ये 1.5 लीटरचे N Atkinson सायकल पेट्रोल इंजिन असणार आहे. आणि त्याचबरोबर दोन इलेक्ट्रिक मोटर्सही असणार आहे. तसेच कमी वेगाने, हे वाहन पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरवर चालण्यास सक्षम असल्याने उच्च वेगाने जाण्यासाठी इंधन म्हणून पेट्रोल वापरत आहे. तसेच या कारचे पेट्रोल इंजिन 97 bhp ची कमाल पॉवर आणि 127 Nm चा पीक टॉर्क जनरेट करत असून, दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळून जास्तीत जास्त 108 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करत आहे.
होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. त्यामुळे होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. ज्यात इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन किपिंग असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ऑटो हाय बीम असिस्ट आणि फ्रंट कोलिजन वॉर्निंग सिस्टीम यांसारखी फीचर्स देखील मिळू शकणार. त्यामुळे एकदा लॉन्च झाल्यानंतर, होंडा सिटी हायब्रीड बाजारात अनेक सेडानशी स्पर्धा करेल. आणि यामध्ये Maruti Ciaz पासून ते Hyundai Verna, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus चा समावेश असून, त्या काही दिवसानंतर लाँच होणार आहेत.



