सोन खरेदी करत असाल तर, त्याआधी जाणून घ्या सोन्याचे दर

buisness batmya
मुंबई : दोन दिवसांपूर्वीच मराठी नवीन वर्षा सुरु झाले आहे. त्यात लोक वर्षभरातील लगेच ताळेबंद बांधायला सुरुवात करतात. खास करून महिला दरवर्षी यंदा कोणता नवीन अलंकार करायचा यासाठी आग्रही असतात. त्यामुळे त्यासाठी सोनं-चांदीच्या किंमतीवर देखील त्यांचे लक्ष असते. म्हणून सोनं आणि चांदीच्या दरांची माहिती असली की अंदाज बांधून आपल्याकडे खरेदीसाठी असलेल्या पैशांचा अंदाजही येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर सांगणार आहोत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 800 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 140 रुपये प्रति तोळा इतका आहे. तसेच इतर शहरातील सोन्याचे दर देखील जाणून घेऊया.If you are buying gold, know the price of gold beforehand
सोन्याचे दर कॅरेटनुसार मुंबई 47,800 रुपये,52,140 रुपये, पुणे 47,850 रुपये, 52,190 रुपये, नागपूर 47,850 रुपये ,52,190 रुपये, नाशिक 47,850 रुपये, 52,190 रुपये, दिल्ली 48,030 रुपये ,52,400 रुपये, चेन्नई 48,030 रुपये, 52,400 रुपये, बंगळुरू 47,800 रुपये, 52,140 रुपये, हैदराबाद 47,800 रुपये, 52,140 रुपये, लखनऊ 47,950 रुपये, 52,290 रुपये, सुरत 47,880 रुपये, 5रुपये2,220 अशा स्वरूपात आहेत.
या मोठ्या दोन पैशावाल्यांच्या वादात कोटीवधीचें नुकसान
या सोनं-चांदीच्या दरांवर युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेल्या युद्धाचे परिणाम होऊ शकतात. तसेच जाणकरांच्या मते युक्रेन आणि रशियाचं युद्ध जर थांबले जर सोनं आणि चांदीचे दर कमी होऊ शकतात. तसेच सोन्याच्या दरात अमेरिकेतील व्याज दर देखील महत्वपूर्ण असल्याने अमेरिकेची फेडरल रिझर्व बॅक व्याज दर वाढवायला सुरुवात करते. मात्र, महागाईची मोठी चिंता आहे त्यामुळे महागाईच्या आकड्यांवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर कुणी सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असेल तर त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.
HDFC चे होणार ‘या’ बँकेत विलिनीकरण, शेअर्समध्ये वाढ
सोन्याचा दर डॉलर आणि भारतीय रुपयाच्या पडझडीवर देखील अवलंबून असतो. भारतात सोन्याची आयात केली जाते. यातच रुपयाची पडझड झाली तर सोन्याच्या दरांमध्ये फरक पडतो. अनेकदा ऐन सणासुदीच्या काळातही सोन्याच्या किंमती वाढतात. त्याही वेळेस डॉलर आणि रुपयातील पडझडीकडे लक्ष द्यायला हवं.तसेच आंतराराष्ट्रीय पातळीवरील युद्धस्थितीमुळे सोनं-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्चपर्यंत सोन्याचे भाव काहीसे वाढले होते. 55,155 रुपये प्रति तोळा असे 24 कॅरेट सोन्याचे दर त्यावेळी होते. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत गेली. 22 ते 28 मार्च पर्यंत पुन्हा दरात वाढ झाली आणि 29 मार्चला सोन्याने 52,215 रुपये प्रति तोळा एवढी निचांकी पातळी गाठली होती.



