तुम्हाला थेट RBI मध्ये खाते खोलता येणार

Bussness batmya
मुंबई : आरबीआयमध्ये खातं कसं उघडतात याची माहिती आपल्याला असणे गरजचे आहे. (RDG) म्हणजे रिटेल डायरेक्ट गिल्ट खाते आहे. ही स्कीम सरकारनं (Government)गेल्या वर्षी सुरू केल्यामुळे जास्त लोकांना याबद्दलची माहिती नाहीये. लहान-मोठे सर्व गुंतवणूकदार या अकाऊंटमधून गुंतवणूक करू शकतात. पूर्वी लहान गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेच्या या योजनेत गुंतवणूक करू शकत नव्हते. (You can open an account directly with RBI)
RDG म्हणजे नेमके काय?
RDG म्हणजे रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाऊंट म्हणजे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, थोडक्यात सांगायचे झाल्यास सामान्य गुंतवणूकदार हे सरकारला कर्ज देऊ शकतात. किरकोळ किंवा लहान गुंतवणूकदार आता यामधून ट्रेझरी बिल्स, भारत सरकारच्या सिक्युरिटीज, सार्वभौम गोल्ड बाँड्स, राज्य विकास कर्ज म्हणजेच SDL मध्ये पैसे गुंतवू शकतात. गुंतवणूकदार आरबीआयच्या रिटेल डायरेक्टर गिल्टही फायदेशीर असल्यानं बरेचजण या स्कीमच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे या संधीचा फायदा कोणीही चुकवू नका असे आव्हान या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
खाते कसे सुरू करता येते ?
RDG मध्ये जॉइंट किंवा सिंगल खाते सुरू करता येते. खाते सुरू करण्याची प्रक्रिया समजून घेऊयात https://www.rbiretaildirect.org.in/ या वेबसाईटवर जाऊन खातं उघडता येतं, तसंच खाते सुरू करण्यासाठी पॅन कार्ड, केवायसीसाठी ओळखपत्र , ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
यानंतर लगेचच तुमचे खाते सुरू होईल आणि हे खाते विना:शुल्क सुरू होते. बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल गुंतवणूकदारांचा यातून कसा फायदा होतो ? तर हो, फायदा हा होतोच खाते तर विनामूल्य आहे, शिवाय ते मेंटेन करण्यासाठी अतिरिक्त पैसे देखील भरावे लागत नाहीत. रिझर्व्ह बँक गुंतवणुकीसाठी स्पेशल ऑफर देतच असतात त्यातून तुम्हाला अधिक परतावा मिळेल. अशी माहिती Finway FSC चे CEO आणि FOUNDER रचित चावला यांनी दिलीये.



