खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण

Buisness Batmya
महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. आता खाद्यतेलाचे दर पुन्हा एकदा खाली आले आहेत. दिल्ली-एनसीआरच्या प्रमुख दूध पुरवठादारांपैकी एक असलेल्या मदर डेअरीने खाद्यतेलाच्या किमती 15 रुपयांनी कमी केल्या आहेत.Big drop in edible oil prices
जगभरातील बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती खाली आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी आपले खाद्यतेल धारा ब्रँड अंतर्गत विकते. धारा मोहरीच्या तेलाची किंमत 208 रुपयांवरून 193 रुपये प्रति लीटर झाली आहे.
Business Idea: आइसक्रीम पार्लर मधून कमावा लाखो रुपये
एमआरपीमध्ये 15 रुपयांपर्यंत कपात
याशिवाय धारा रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल पूर्वी 235 रुपये प्रति लीटर वरून आता 220 रुपयांना विकले जाईल. धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची किंमत 209 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत कमी केली जाईल. तसेच मदर डेअरीने एका निवेदनात म्हटले आहे की, धारा खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत प्रति लिटर 15 रुपयांनी कमी केली जात आहे.
दरम्यान किमतीतील ही घट अलीकडील सरकारी उपक्रम, आंतरराष्ट्रीय बाजाराचा कमी झालेला प्रभाव आणि सूर्यफूल तेलाची वाढलेली उपलब्धता यामुळे झाली असून, नवीन एमआरपीसह धारा खाद्यतेल पुढील आठवड्यापर्यंत बाजारात पोहोचेल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षभरापासून चढेच आहेत. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत दरवर्षी सुमारे 13 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतो. खाद्यतेलासाठी देशाची आयात अवलंबित्व ६० टक्के आहे.



