शेयर मार्केट

मस्त Stock market या शेअर्सचे झाले १ लाखाचे १५ लाख

business batmya

मुंबईः These shares became 1 lakh to 15 lakh,  शेअर बाजार सध्या गडगडला असला तरी चालू आणि गेल्या वित्त वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला देखील पाहायला मिळाला आहे. वित्तीय अस्थिरता आणि आर्थिक उतार-चढाव यामध्ये शेअर मार्केटनं गेल्या वर्षभरात विविध रंग गुंतवणुकदारांना दाखवले आहेत.

शेअर मार्केट आज शहरातल्या मोठ्या गुंतवूणूकादारापासून ते ग्रामीण मधील छोट्या गुंतवणूकदारांना पर्यंत येऊन पोहोचलेले आहे.  मात्र शेअर्समध्ये ज्यांचा अनुभव चांगला त्याचं अनुकरण इतर गुंतवणूकदार  करतात व त्यातून पैसे कमवितात. शेयर मार्केटचं काय इतर ठिकाणी पण आपण तसा अनुभव घेतो. मात्र पुढच्याला ठेस लागली तर मागचा शहान होतो. तशी ही स्थिती आहे. म्हणून पुढे जाणारा जर वेगात असेल तर आपण त्यामागे वेगाने जातो. हे तसेच आहे. (These shares became 1 lakh to 15 lakh, )

SMS एक मेसज तुमच्या बॅंकेतील सर्व पैसे गायब करणार

काही हुशारीनं गुंतवणूक केलेल्यांना यामध्ये कोट्यवधींचा फायदा झाल्याचंही दिसून आलं आहे. यातील एक उत्तम परतावा देणारा एक स्टॉक ठरला आहे तो म्हणजे जिंदाल फोटो (Jindal Photo) कंपनीचा. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल १४०० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

HDFC Life Insurance एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सला नफा होऊन उत्पन्न वाढ

आज बरोबर एका वर्षानंतर २१ जानेवारी २०२२ रोजी कंपनीचा एक शेअर ४०८ रुपयांवर पोहोचला होता. याच दरम्यान बीएसई सेन्सेक्स १९ टक्क्यांनी वधारला आहे. जिंदाल फोटो ही एक होल्डिंग कंपनी असून सिक्युरिटीज कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.जिंदाल फोटो बीसी ही जिंदाल ग्रूपचीच सहभागी कंपनी आहे. २१ जानेवारी २०२१ रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत २७.२० रुपये इतकी होती.

Tata Tiago CNG:टाटाचा मारुती सुझुकीला दे धक्काः सुझीकी पेक्षा कमी किमंती मध्ये लॅान्च

कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते आणि हे काम कोणत्याही अर्थ सल्लागाविना करू नये, असा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे. फॉर्च्युन इंडिया’च्या अहवालानुसार बीएसईनं या शेअरला लाँग टर्म सव्हिलान्स स्टेजमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे या शेअर्सची खरेदी-विक्री अधिक काळजीपूर्वक करायला हवी.याच मल्टीबॅग स्टॉकमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी २१ जानेवारी २०२१ रोजी २७.२० रुपये हिशोबानं १ लाख रुपये गुंतवले असतील त्यांच्या स्टॉकची किंमत आज १५ लाख रुपये इतकी झाली आहे. अर्थात हा अहवाल वाचून लगेच या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवावं असं होत नाही. कारण हे शेअर मार्केट आहे. काळजी व आपल्या जोखीमवर हे पैसे गंतवणूक केली पाहिजेत असा सल्लाही सल्लागार देतात.

Tata Tiago CNG:टाटाचा मारुती सुझुकीला दे धक्काः सुझीकी पेक्षा कमी किमंती मध्ये लॅान्च

शेअरचा रेकॉर्ड

गेल्या ३ वर्षात या स्टॉकनं १२०० टक्के, ५ वर्षात ४०६ टक्के आणि गेल्या १० वर्षाच्या कालावधीत तब्बल १६४ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांचा रेकॉर्ड पाहात तर या स्टॉकनं जवळपास ४५० टक्के नफा मिळवून दिला आहे. तर चालू महिन्यात ४१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या १२ सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकनं सलग वाढ नोंदवली असून ही वाढ ५८ टक्के इतकी मिळाली आहे.जिंदाल फोटो शेअरचं मार्केट कॅपिटलायझेशन ४१८.५४ कोटी रुपये इतकं आहे. या मायक्रोकॅप स्टॉकनं शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये मोठा परतावा मिळवून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!