स्वस्त अन् मस्त! Oneplusचा 43 इंचाचा Smart TV उद्यापासून
Cheap and cool! Oneplus's 43-inch Smart TV from tomorrow

वनप्लस 7 एप्रिल रोजी वनप्लस 43-इंचाचा Y1S Pro स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च करणार आहे. Oneplus 43 inches Smart TV: लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता वनप्लस उद्या भारतात आणखी एक स्मार्ट टीव्ही सादर करणार आहे. हा ब्रँड सध्या आपल्या ग्राहकांना 32-इंचाच्या HD टीव्हीपासून प्रीमियम 4K टीव्हीपर्यंतचे पाच स्मार्ट टीव्ही ऑफर करतो.
आता OnePlus Y1S Pro सीरिज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही सादर करून स्मार्ट टीव्ही विभागात आणखी विस्तार करण्याची तयारी करत आहे.
OnePlus 43-इंच Y1S Pro स्मार्ट टीव्हीची किंमत-
वनप्लसने आपल्या आगामी स्मार्ट टिव्हीच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली असली तरी या टिव्हीतील फिचर्स तसेच वैशिष्ट्ये पाहता वनप्लस 43-इंच Y1S Pro ची किंमत भारतात सुमारे 30,000 रुपये असू शकते.
OnePlus 43-इंच Y1S Pro स्मार्ट टीव्ही वैशिष्ट्ये-
वनप्लस 43-इंचाचा Y1S Pro स्मार्ट टीव्ही 43-इंच स्क्रीन आकारासह येईल. आगामी स्मार्ट टीव्ही 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. 10-बिट डिस्प्लेसह, स्मार्ट टीव्ही 1 अब्ज रंग दाखवू शकेल. याशिवाय OnePlus Y1S Pro HDR10+, HDR10 आणि HLG फॉरमॅटला देखील सपोर्ट करतो.



