स्वस्तात मस्त, एमजीची नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात येणार

Buisness Batmya
मुंबई: सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कारप्रेमींचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यावर जोर देत आहेत. अशातच केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदानही जाहीर केलं आहे. तरीदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती खिशाला परवडणाऱ्या नसतात.Cheap cool, MG’s new electric car is coming to India soon
एमजीची ही नवीन इलेक्ट्रिक कार आकाराने खूपच लहान असणार असून या गाडीला फक्त दोन दरवाजे असतील आणि 4 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. तसेच ही कार कंपनी पुढील वर्षी भारतात लाँच करु शकते. या गाडीची लांबी 2,197 मिमी, रुंदी 1,493 मिमी आणि उंची 1,621 मिमी असेल. तर व्हीलबेस 1,940 मिमी असेल. म्हणजे एकंदरीत ही कार आकाराने मारुती अल्टो इतकी मोठी असणार आहे. तसेच भारतीय ग्राहकांचं बजेट लक्षात घेऊनच कंपनी ही कार भारतात लाँच करण्याचा विचार करत आहे.
जबरदस्त लूकसह 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच, पहा किंमत
दरम्यान या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये एबीएससह EBD, पार्किंग सेन्सर्स आणि पुढच्या बाजूला ड्युअल एअरबॅगसह असणार. आणि त्याशिवाय कारला कनेक्टेड कार तंत्रज्ञानही मिळू शकते. यात 20 kW-R बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच या कारला एका चार्जवर 150 किमी पर्यंतची रेंज देणारी असेल.
या नवीन इलेक्ट्रिक MG EV ची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असून ग्राहकांच्या बजेटमध्ये असणार आहे. सध्या भारतातील टाटा टीगोर सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून या गाडीची एक्स-शोरूम किंमत रु. 11.99 लाख आहे.
भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला