तुमच्या रेल्वे टिकीटावर मित्रही प्रवास करणार या पध्दतीने!

नवी दिल्ली : Friends will also travel on your train ticket! ( रेल्वेचा प्रवास हा सगळ्यात सुखकर आणि आरामदायी व स्वस्त प्रवास असल्यामुळे प्रत्येक जण रेल्वेचा प्रवास निवडतो मात्र काही लोकांना रेल्वेने प्रवास करताना हे माहीत नसेल की आता तुमच्या कन्फर्म तिकीटवरती तुमचा मित्र किंवा एखादी व्यक्ती प्रवास करता येईल. आणि आपण ही बातमी जर वाचत असेल तर ही बातमी खरी आहे. कारण तशी सुविधा रेल्वेकडे आहे.
worlds-largest जगातील सर्वात मोठं विमान झेपावले आकाशातंं
सर्वप्रथम सांगायचं झालं म्हणजे पहिले आपल्याला रेल्वेचा टिकीट किंवा बुकिंग करण्यासाठी आपल्याला स्टेशन गाठावे लागायचं मात्र आता ते दिवस राहिले नाही डिजिटल च्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती सर्व कामे आपल्या हातामधून करतो आहे. ज्या ठिकाणावर तुम्ही उभे त्या ठिकाणाहून रेल्वेचे तिकीट सुद्धा बुक होतयं ही आधुनिक भारत आणि जगाची चांगली स्थिती आहे.
युट्यूब वरील छोटु दादा कमवितो एका व्हिडीओतून एवढे पैसे! How To Make Money From YouTube
आपण इतर ठिकाणी अशा अनेक वेळा प्रवासी तिकिट बुक करतात मात्र अचानक त्यांचं काही काम निघतो किंवा मोठा काहीतरी अडथळा निर्माण होतो त्यामुळे त्यांना आपलं तिकिट रद्द करावं लागतं किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी पाठवण्यासाठी पुन्हा त्या व्यक्तीला दुसरं तिकीट काढावं लागतं, यामध्ये रेल्वे प्रवाशांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो मात्र, यानंतर कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते. त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे.
भारतात सर्वात कमी किमंतीची स्कूटर लॅान्च , कोणीही खरेदी करेल इतकं किमंत
ही सुविधा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, परंतु लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हे जाणून घेऊ.
एखादा प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करावी लागेल. यानंतर, तिकिटावरील प्रवाशाचे नाव कापले जाते आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर केले गेले आहे, त्याचे नाव तिकिटावर दिले जाते.
24 तास अगोदर द्यावा लागतो अर्ज
जर प्रवासी सरकारी कर्मचारी असेल आणि आपल्या ड्युटीसाठी जात असेल तर तो ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करू शकतो, ज्या व्यक्तीसाठी विनंती केली आहे, त्याच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर केले जाईल. लग्नाला जाणाऱ्या लोकांसमोर अशी परिस्थिती आल्यास लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास आधी अर्ज करावा लागतो. ही सुविधा तुम्ही ऑनलाइनही मिळवू शकता. ही सुविधा एनसीसी कॅडेट्ससाठीही उपलब्ध आहे.
फक्त एकदाच मिळते संधी
भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की, तिकिटांचे ट्रान्सफर फक्त एकदाच केले जाऊ शकते. म्हणजे, जर प्रवाशाने आपले तिकीट दुसर्या व्यक्तीला एकदा ट्रान्सफर केले असेल तर तो ते बदलू शकत नाही. म्हणजेच आता हे तिकीट इतर कोणालाही ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही.
ट्रेनचे तिकीट कसे ट्रान्सफर करावे?
1. तिकिटाची प्रिंट काढा.
2. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या रिजर्व्हेशन काउंटरला भेट द्या.
3. ज्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे, त्यांचे ओळखपत्र जसे की आधार किंवा मतदान कार्ड घेऊन जावे लागेल.
4. यानंतर काउंटरवर तिकीट ट्रान्सफरसाठी अर्ज करावा लागेल.



