खुशखबर! 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी, या महिन्यापासून सुरु होणार 5G इंटरनेट सेवा

Buisness Batmya
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दूरसंचार कंपन्या 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची मागणी करत होत्या. सरकारकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे आता 5Gचा आनंद लुटता येणार असून इंटरनेट स्पीडही वाढणार आहे.
तसेच 8 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज करता येणार असून ,26 जुलैपासून लिलाव सुरु होणार आहे. कारण ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले, “दूरसंचार सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करण्याची किंमत कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाने IMT/5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली असल्याने 5G सेवा लवकरच सुरु होणार आहे.
शेअर बाजार घसरला…, Nifty 15,800 वर तर Sensex 1456 अंकांनी घसरला
तुमच्या माहितीसाठी सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली असून हा लिलाव 20 वर्षांसाठी असणार आहे. तर या अंतर्गत 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 MHz बँडचा लिलाव होणार आहे. तसेच सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलावासाठी दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, ज्याअंतर्गत सार्वजनिक आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी यशस्वी बोली लावणाऱ्यांना स्पेक्ट्रम प्रदान केले जाईल.
याबाबत सरकार जुलै अखेरीस 20 वर्षांच्या मुदतीसाठी एकूण 72097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. याशिवाय विविध कमी, मध्यम आणि उच्च वारंवारता बँडसाठी स्पेक्ट्रम लिलाव देखील होणार आहे. त्यात दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांना चालना देत, मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलावाशी संबंधित अनेक विकास पर्यायांची घोषणा केली आहे. ज्यामुळे व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे.



