क्रेडिट कार्ड युजर्ससाठी आनंदाची बातमी, रिझर्व बँकेतर्फे लवकरच सुरू करणार ही सेवा

Buisness Batmya
मुंबई : जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड युजर असाल आणि युपीआय देखील वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सुधारित पतधोरण जारी करताना आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी यासंबधी घोषणा केली आहे.Good news for credit card users, this service will be launched soon by the Reserve Bank
तुम्हाला गृह आणि वाहन कर्जावर आणखी किती व्याज द्यावे लागेल?
आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीने घेतलेल्या निर्णयांबाबतीत माहिती देतांना सांगितलं की, बँक डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असून युपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची सुरूवात रुपे क्रेडिट कार्डपासून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यानंतर युपीआयला क्रेडिट कार्डशी जोडण्याची प्रक्रिया नंतर मास्टरकार्ड आणि वीजा कार्डपर्यंत देखील वाढवण्यात येणार आहे. ही सुविधा त्या लोकांसाठी फायद्याची असणार आहे जे आपल्या गरजेनुसार क्रेडिट कार्डवरून रोख काढतात. किंवा पेटीएम सारख्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डचे पैसे ऍड करतात. तसेच ही सुविधा सुरू झाल्यानंतर क्रेडिट कार्ड स्वाइप शिवायदेखील पेमेंट करता येणार आहे. यासाठी आधी युपीआय तुमच्या क्रेडिट कार्डला लिंक करणे गरजेचे असणार आहे.
रिझर्व बँकेकडून निर्बंध असलेल्या या बँकेतून आता 5 लाखापर्यंत रक्कम येणार काढता