एलआयसी पॅालिसाीत गुंतवणुक करत असाल तर मिळणार 20 लाख रूपये

buisness batmya
नवी दिल्लीः अनेक जणांच्या एलआयसीच्या विमा पॅालिसी काढलेल्या असतात. कारण पॅालिसी ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामुळे कंपनी देखील लोकांच्या गरजा लक्षात घेऊनच एलआयसीच्या पॅालिस्या सुरू करत असते. अशातच कंपनीच्या अनेक विमा पॉलिसी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये एलआयसी जीवन लाभ या पॉलिसीचाही समावेश असल्याने या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर पॉलिसी होल्डरला इन्शोरन्स कव्हरसह एकरकमी २० लाख रुपये मिळत असून त्याबरोबर सेव्हिंग बेनिफिटसुद्धा मिळते.If you are investing in LIC policy, you will get Rs 20 lakh
देशातील सर्वात मोठी इन्शोरन्स कंपनी असलेल्या एलआयसीने फेब्रुवारी २०२०मध्ये या पॉलिसीची सुरुवात केली होती. तर ही एक नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हुजवल, लाईफ इन्शोरन्स सेव्हिंग पॉलिसी आहे. त्यामुळे जर हा प्लॅन घेतला तर पॉलिसी होल्डर्सला प्रोटेक्शनसह अॅट्रॅक्टिव्ह सेव्हिंग फिचर्सही मिळत असतात. म्हणूनच जर या एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.
पेट्रोल-डिझेल सोबत सीएनजीचाही भडका
तसेच यामध्ये मॅच्युरिटीनंतर जीवित पॉलिसी होल्डरला एकरकमी लाभ देखील दिला जातो. म्हणूनच एलआयसीच्या या प्लॅनमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यक्तीला कर्जही घेता येते. त्यामुळे कोणतीही व्यक्ती १६ वर्षे, २१ वर्षे आणि २५ वर्षे मॅच्युरिटी अवधीसह या स्किममध्ये गुंतवणूक करता येते. तसेच प्रीमियमच्या मॅच्युरिटीचा कालावधी हा १० वर्षे १५ वर्षे आणि १६ वर्षे असा आहे. त्यामुळे या स्किममध्ये गुंतवणुकीसाठी प्रीमियमचं पेमेंट मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक असे देखील करता येऊ शकते.
दरम्यान या एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार जर कुणी व्यक्ती २० लाख रुपयांच्या सम-इन्शोरन्स सोबत ही पॉलिसी घेत असेल, तर त्याला एलआयसी जीवन लाभ योजनेमध्ये दर महिन्याला करासह ७ हजार ९१६ रुपये गुंतवावे लागत असतात. तसेच या प्रीमियमचा भरणा १६ वर्षांपर्यंत करावे लागत असून, तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत या पॉलिसीला कायम ठेवल्यावर दोन बोनस मिळू शकतील. आणि हा बोनस मिळाल्यावर तुम्हाला एकूण ३७ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे.
12 वर्षांखालील मुलांसाठी LIC ची नवी पॉलिसी, कमी पैशातं गंतवणूक करा व दुप्पट बोनस
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये ८ वर्षांपासून ते ५९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील कुठलीही व्यक्ती गुंतवणूक करू शकेल. त्यासाठी या पॉलिसीमध्ये तुम्हाला किमान दोन लाख रुपयांच्या सम इन्शोरन्स गुंतवणूक करू शकतात. मात्र यासाठी कुठलीही कमाल मर्यादा निर्धारित करण्यात आलेली नसून, या स्किममध्ये गुंतवणूक केल्यानंतर प्राप्तिकरामधूनही सवलत मिळणार आहे.



