आता केसांना मिळतो एवढ्या हजाराचा भाव, कोणाकडे विकणार?
आता केसांना मिळतो एवढ्या हजाराचा भाव, कोणाकडे विकणार?

business batmya / business News / बिझनेस बातम्या
( एकनाथ भालेराव ) येवला,ता. 14 सप्टेंबर 2024 – महिलांचे केस धुताना किंवा विंचरताना गळतात किंवा तुटतात परंतु या तुटलेल्या केसांनाही बाजारात मोठी किंमत मिळते आणि ते हजार ते दोन हजार रुपये प्रतिकिलोने विकले ही जातात. घरोघरी फिरणारे फेरीवाले केसांच्या बदल्यात भांडी किंवा प्लॅस्टिकचे टप,बादली,घमीली,देतात. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात या केसांना मोठी मागणी असल्याचे समजते या केसांचा उपयोग विग बनविण्यासाठी केल्या जात आहेत. केसांचा आकार आणि गुणवत्तेनुसार त्याची किंमत होते.महिलांच्या डोक्यावरील विचरताना गळून पडलेल्या केसांनाच आपल्याकडे मागणी असुन मात्र सलून दुकानात कटिंग केल्यानंतर पडणारे केस विकले जात नाहीत किंवा त्याला कोणी विचारत नाही.
price of gold सोन्याचा भाव गेला ना वाढून, तुम्ही घेतलं का नाही
केसांना भाव काय
ग्रामीण भागात शक्यतो थेट पैसे देऊन कुणी केस खरेदी करत नाहीत किंवा हे केस विकण्याची अशी बाजारपेठही नाही त्यामुळे गावात घरोघरी फिरुन भांड्यांच्या बदल्यात केस जमा करुन छोटे व्यावसायिक केस एकत्र करुन ते मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. केसांची गुणवत्ता आणि लांबीनुसार प्रतिकिलो एक ते चार हजार रुपयांपर्यंत पैसे मिळत असल्याची माहिती आहेत.
कांदा यंदा शेतक-यांचे नशीब घडविणार ! सरकाने आज घेतला मोठा निर्णय Onion exportexport value
या केसांचे काय केले जाते
भारतात केसांचा व्यवसाय स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरु असल्याचे बोलले जाते परदेशात भारतीय महिलांच्या केसांना मोठी मागणी आहे त्यामुळे भारतातून चीन, मलेशिया, थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, ब्रह्मदेश यासह अनेक देशांत भारतीय केस पाठविले जातात. या केसांपासून विंग बनविले जातात.
याला म्हणतात नशीब ! तासातंच 1 लाखाचे झाले 5 कोटी रुपये ही लोक झाले मालामाल
केस विकत घेतो कोण
ग्रामीण भागात गावात घरोघरी फिरुन छोटे व्यावसायिक केस गोळा करतात मग ते केस शहरातील मोठ्या व्यापाऱ्याला विकतात मग व्यापाऱ्याकडून ते कंपनीला विकतात तेथे केसांची वर्गवारी करून त्याची बंडल तयार होते त्यानंतर या केसांची परदेशात निर्यात केली जाते. तेथे केसांपासून विंग तयार केले जातात. हे विग लाखो रुपयांना विकले जातात.
नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव
महिला केस विंचरत असताना काही केस गळून पडली तर ती केस आपल्याकडे विकली जाते. या केसांपासून विंग तयार होते .या विगला बाजारात मोठी किंमत ही मिळते .मात्र सलूनमध्ये कटिंग केल्यानंतर पडलेले केस विकले जात नाहीत. सलूनमधील केसांवर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल.
अनिल सोनवणे – , सलून व्यावसायिक येवला