Realme C30 चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच

Buisness Batmya
काही दिवसांपूर्वी भारतात रियलमीने स्मार्टफोन्सची संख्या वाढवली होती. त्यात आता काही नवीन स्मार्टफोन लॅांन्च करण्याच्या तयारीत ही कंपऩी आहे. त्यामुळे Realme C30 स्मार्टफोन लवकरच एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये सादर केला जाऊ शकतो.Realme C30’s new smartphone will be launched in India soon
Share Market: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे दमदार 10 शेअर्स
तसेच या रियलमीचा डेनिम ब्लॅक, लेक ब्लू आणि बँबो ग्रीन कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. त्यामध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळेल जी 10W चार्जिंगला सपोर्ट करू शकते. म्हणूनच या फोनची जाडी 8.48mm आणि वजन 181 ग्राम असेल. तर भारतात रियलमीचा हा स्मार्टफोन 7,000 रुपयांची किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
जुन्या Realme C31 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय आर एडिशनवर चालतो. यात सी31 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते. आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यामध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
रियलमी सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून, ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. रियलमी सी31 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
होम लोन लवकर फेडण्याच्या विचारात असाल तर जाणून घ्या काही खास गोष्टी



