Smartphones अवघ्या 5 हजार रुपयात स्मार्टफोन

नवी दिल्ली : अगदी ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही शानदार स्मार्टफोन खरेदी करू शकता. विशेष म्हणजे इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील हे स्मार्टफोन चांगला पर्याय आहेत. ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये बाजारात JioPhone Next, Lava Z21 आणि itel A23 Pro सारखे फोन्स उपलब्ध आहेत.
Smartphones Under Rs 5000: फीचर फोन वापरत असाल व नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असल्यास बाजारात कमी किंमतीत येणारे शानदार पर्याय उपलब्ध आहेत. सविस्तर जाणून घेऊया.
JioPhone Next
JioPhone Next मध्ये ५.४५ इंच एचडी+ स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ दिला आहे. फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल रियर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा एचडीआर मोड, नाइट मोड, पोर्ट्रेट मोड सपोर्ट करतो. पॉवरसाठी ३५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन क्यूएम २१५ प्रोसेसरसह येतो. यात २ जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. यात ४जी सपोर्ट मिळतो.
Lava Z21
Lava Z21 स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोन ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो. पॉवरसाठी ३१०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. डिव्हाइस अँड्राइड ११ गो एडिशनवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे.
itel A23 Pro
itel A23 Pro मध्ये ५ इंच डिस्प्ले, १.४ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसर, पॉवरसाठी २४०० एमएएचची बॅटरी, स्मार्ट फेस अनलॉक फीचर दिले आहे. हा फोन अँड्राइड ओरियो १०.० (गो एडिशन) ओएसवर काम करतो. फोटोग्राफीसाठी २ मेगापिक्सल रियर आणि VGA सेल्फी कॅमेरा दिला आहे. कॅमेरा ब्यूटी मोड सपोर्ट मिळतो. दरम्यान, या तिन्ही स्मार्टफोनची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
ईटेल ए23 प्रो स्पेसिफिकेशन्स
परफॉर्मन्स Unisoc SC9832E
डिस्प्ले 5.0 inches (12.7 cm)
स्टाेरेज 8 GB
कॅमेरा 2 MP
बॅटरी 2400 mAh
भारतातील किंमत 3999
रॅम 1 GB



