उद्योग / व्यवसाय

Gautami Patil ही गौतमी कोण? कुठून आली

सबसे कातील गौतमी पाटील… (Gautami Patil) आपल्या नृत्यानं महाराष्ट्राला वेड लावते. तिच्या चाहत्यांची आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या तर अगणित असून रोजच्या रोज वाढत आहे. पण यासोबत तिच्या डान्सवर टिका करणाऱ्यांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. फक्त अश्लील डान्स नाहीच तर त्यासोबत अनेकानेक कॉन्ट्रोव्हर्सीज पण आहेत… अचानक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणारी ही गौतमी कोण? कुठून आली… काय आहे तिची पूर्ण कहाणी आज Womens Day च्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. (Gautami Patil Dance)

गौतमीनं लावणी डान्सर होण्याचा निर्णय का घेतला त्याविषयी तिनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे. गौतमीचा जन्म हा तिच्या आजोळी धुळ्यातील शिंदखेडा या गावात झाला. काही दिवसांनी गौतमीच्या वडिलांनी तिच्या आईला सोडून दिलं. त्यामुळे गौतमीही शिंदखेडा येथेच लहानाची मोठी झाली. कामा निमित्तानं गौतमीचं कुटुंब हे पुण्यात गेले. अचानक आठवीत असताना गौतमीचे वडील तिच्या समोर आले. पुण्यात रहायला लागल्यानंतर गौतमीनं तिच्या वडीलांना तिथे बोलावण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि त्यासोबतच ते आईला मारहाण देखील करायचे. ते पाहता तिनं वडिलांपासून दूर राहणं पसंत केलं.

त्यावेळी तिची आई छोटी-मोठी काम करू लागली. पण एके दिवशी अचानक तिच्या आईचा अपघात झाला. आईच्या अपघातानंतर त्यांच्यावर खूप वाईट परिस्थिती आली. कारण अपघातानंतर गौतमीची आई कामावर जाऊ शकत नव्हती. आता घर कसं चालवणार… आणि घराची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला. हे पाहता गौतमीनं संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.

कसा सुरु झाला गौतमीचा पुढचा प्रवास?
गौतमीनं सगळ्याच आधी पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे डान्सचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळेच गौतमीनं डान्सच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. खरंतर गौतमीनं असा निर्णय घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं शिक्षणही कमी झालं होतं. अशा परिस्थितीत तिला काम मिळणं शक्य नव्हतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!